मोटारीच्या कारणावरून मारहाणीत जखमी


पुसेसावळी:-  खटाव तालुक्यातील शिंदेवाडी भूषणगड तेथे विहिरीतील मोटारीच्या कारणावरून कारणावरून जाब विचारलेबाबत सूर्यकांत जगताप याला सहा जणांनी केल्याने या मारहाणीत तो जखमी झाला आहे.या प्रकरणी भूषणगड येथील सहा जणांविरोधात पुसेसावळी पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दाखल करण्यात आली आहे.याबाबत पुसेसावळी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,30 जानेवारीला सकाळी नऊ वाजता सूर्यकांत हा गुराच्या गोठ्याजवळ बसला होता.दरम्यान,मल्हारी जगू जगताप, संभाजी मल्हारी जगताप,धोंडीराम दुर्योधन जगताप,भानुदास जगताप, विनायक जगु जगताप,दुर्योधन जगू जगताप यांनी काठ्यांनी मारहाण केल्याने सूर्यकांत जगताप यांच्या याच्या उजव्या हाताला व उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.याप्रकरणी उत्तम लक्ष्‍मण जगताप यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. पुढील तपास हवालदार फिरोज मुल्ला करीत आहेत.

No comments

Powered by Blogger.