तलावावर बेकायदेशीर विदूत मोटरा सुरूच


म्हसवड :-सातारा जिल्ह्यात असलेल्या म्हसवड नजीकच्या राजेवाडी तलावामध्ये सध्या पाण्याचा मृत साठाच शिल्लक असताना तलावाशेजारील शेतकर्यांनी मृत साठ्यातील ते पाणी विद्युत मोटारीच्या साह्याने अहोरात्र उपसण्यास सुरुवात केली आहे, यामुळे तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होवु लागली आहे त्यामुळे तलावातील माशांची पाण्यावाचुन मर सुरु झाली असुन मासेमारी सोसायटीचे यामुळे अर्थिक नुकसान तर होवु लागले आहे याशिवाय मच्छिमारांचे हाल सुर झाले आहेत याठिकाणी जिल्हाधिकारी सातारा यांनी लक्ष देवुन तात्काळ सदरच्या विद्युत मोटारी बंद कराव्यात अशी मागणी देवापुर मच्छिमार सोसायटीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असुन विद्युत मोटारी बंद न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

याबाबत देवापुर मच्छिमार सोसायटीच्या वतीने जिल्हाधिकारी सातारा यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की राजेवाडी हा तलाव माणच्या हद्दीत असल्याने या तलावावर जिल्हा मच्छ विभागाचे नियंत्रण असुन या विभागाच्या नियमानुसार या तलावर देवापुर मच्छिमार सोसायटीची नोंदणी झालेली आहे, जिल्हा मच्छविभागाच्या आदेशानुसारच सदर तलावामध्ये या सोसायटीने लाखो रुपयांचे मच्छबीज सोडले आहेत, त्यामुळे सदर तलावावात मासेमारी करुन या सोसायटीच्या सभासदांचा उदरनिर्वाह सुरु आहे, सध्या सदर तलावामध्ये पाण्याचा मृत साठा शिल्लक असल्याने या तलावातुन कोणत्याही परिस्थितीत शेतकर्यांनी पाणी उचलु नये असा शासनाचा आदेश असतानाही तलावाशेजारील शेतकर्यांनी राजकिय पदाधिकार्यांना हाताशी धरुन प्रशासनाच्या अधिकार्यांवर दबाव आणुन शासनाचा आदेश डावलुव रात्रंदिवस बेसुमार पाणी उपसा सुरु केला आहे, 

यामुळे सदर तलावातील पाणी पातळी रोज कमी होत असुन काही दिवसांतच यामुळे सदर तलाव हा कोरडा पडण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आमच्या सोसायटीचे खुप मोठे अर्थिक नुकसान होणार आहे, तर शेतकर्यांनी शेतीच्या पाण्यासाठी सुरु केलेली पाणी चोरी ही बेकायदेशीर असुन त्यासाठी असंख्य विद्युत मोटारी लावण्यात आलेल्या आहेत तर यासाठी लागणारी विजही चोरुन घेतली जात आहे तर चोरी केलेल्या पाण्यावर या परिसरात बेकायदा विटभट्टयाही सुरु असुन ते पाणी या विट भट्टयांना राजरोजपणे वापरले जात आहे, त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी सदर ठिकाणी भेट देवुन याठिकाणी सुरु असलेल्या पाण्याचा दुरुपयोग बंद करुन सोसायटच्या सभासदांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदनावर सुमारे १०० हुन अधिक सभासदांच्या सह्या आहेत.

No comments

Powered by Blogger.