फलटण येथे धनगर वधु वर मेळावा संपन्न


फलटण : उत्तरेश्वर वधु वर सूचक मंडळाच्या वतीने फलटण येथील सावतामाळी मंदिरा मध्ये धनगर वधु वर पालक परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला
          विधानपरिषद चे आमदार रामहरी रूपनवर यांच्या शुभहस्ते परिचय मेळाव्याचे उदघाटन झाले. खंडाळा प स  सभापती मकरंद मोटे, श्रीराम कारखाना चेअरमन डाॅ बाळासाहेब शेंडे, रासप जिल्हा अध्यक्ष मामूशेठ विरकर कोळकी सरपंच सौ रेश्मा देशमुख, प स सदस्य लता कोळेकर नगरसेविका वैशाली चोरमले, विडणी सरपंच सौ रूपाली अभंग शंकरराव माडकर गोविंद देवकाते,दशरथ फुले रामभाऊ ढेकळे बापुराव लोखंडे आप्पासाहेब लोखंडे  आदींची प्रमुख उपस्थिती होती
      यावेळी सौ रेश्मा देशमुख , मामुशेठ विरकर डाॅ बाळासाहेब शेंडे मकरंद मोटे आमदार रामहरी रूपनवर   आदींनी मनोगत व्यक्त केले शशिकांत सोनवलकर ज्ञानेश्वर बुरूंगले यांनी सूत्रसंचलन  दादासाहेब चोरमले यांनी प्रस्ताविक केले
       कार्यक्रमास मोठ्या संख्येने वधु वर पालक धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.