खासदार गटातील चौघांना तात्पुरता जामीन


सातारा : सुरुची राडा प्रकरणात खासदार गटाच्या चौघांना मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात तात्पुरता अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झाला असून, पुढील सुनावणी दि. 7 फेब्रुवारीला आहे.

अमर किर्दत, सचिन बडेकर, प्रीतम कळसकर, जीवन निकम अशी तात्पुरता अटकपूर्व जामीन झालेल्यांची नावे आहेत. सुमारे 4 महिन्यांपूर्वी सुरुची राडाप्रकरणी खासदार व आमदार गटातील कार्यकर्त्यांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात फायरिंग, तोडफोड, जाळपोळीचे गुन्हे दाखल आहेत. घटना घडल्यानंतर दोन्ही गटांतील अनेक कार्यकर्ते पसार झाले होते. गेल्या दहा दिवसांपूर्वी याप्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर जामिनाच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयात दोन्ही गटांचे कार्यकर्ते नियमित जामिनासाठी व तात्पुरत्या जामिनासाठी गेले होते. त्यानुसार दोन्ही जामिनाच्या अर्जावर सुनावणीला वेग आल्याने कार्यकर्त्यांमध्ये खुशीचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments

Powered by Blogger.