कार्वे मारामारी; १२ जणांवर गुन्हे


कराड :कार्वे ता. कराड येथे युवकांच्या दोन गटात जुना वाद उफाळून येऊन मारामारी झाली. यात तीनजण जखमी असून परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटाच्या 12 जणांवर कराड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी सायंकाळी ही मारामारी झाली होती. विजय शिरीष थोरात (वय22), ओंकार धनाजी पाटोळे (वय 18) व अमन मुल्ला अशी जखमींची नावे आहेत.

याबाबत विजय थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अमन मुल्ला, ओंकार पाटोळे, असिफ मुलाणी, अमन मुलाणी, शहारुख पठण व मटण दुकानदार शहारुख या सहाजणांनी आपसात संगनमत करून थोरात याच्या घरासमोर त्याला लोखंडी गज, चाकू मारून गंभीर जखमी केले. तसेच लाथाबुक्क्यांने मारहाण केली.

तर ओंकार पाटोळे याने दिलेल्या फिर्यादीवरून ओंकार हा त्याचा मित्र अमन मुल्ला हे दोघे खंडोबा चौकात बोलत बसले असताना विजय थोरात, विकी शशिकांत थोरात, संकेत थोरात, मयूर भोसले, सुहास चव्हाण व अभिनव बोंद्रे यांनी आपसात संगनमत करून ओंकार व अमन मुल्ला यांना दांडक्याने व चाकूने मारून गंभीर जखमी केले. तसेच लाथाबुक्क्याने मारहाण केली.

No comments

Powered by Blogger.