दीवशी बु. येथील जमीन ग्रामस्थाना अंधारात ठेवुन लाठण्याचा प्रयत्न त्या विरोधात ग्रामस्थ अंदोलनाच्या पवित्र्यात


पाटण: पाटण प्रतिनीधी दिवशी बु॥ ता. पाटण गावातील 750 एकर डोंगर शेत जमीन वडीलांच्या नावावर करण्याचे रामायण गावातील मंत्रालयात असणार्‍या व्यक्तीने केला असून शासनाने दखल न घेतल्यास धरणे अंदोलन, भूक हरताळ, असहकार चळवळ अशा प्रकारे तीव्र अंदोलन करण्याचा निर्णय निवेदनाव्दारे प्रसिद्धीस दिला आहे. निवेदनावर 400 ग्रामस्थांच्या सह्या आहे.

दिवशी बु॥ ता. पाटण गावाच्या मालकीची 750 एकर डोंगर शेत जमीन गावातीलच ग्रामविकास मंत्रालयातील अवर सचिव पदावर कार्यरत असणारे भरत आत्माराम पाटील यांनी ग्रामस्थांना अंधारात ठेवून पदाचा गैरवापर केला व सर्व मिळकत जमीनीचा कब्जा स्वत:च्या वडीलांच्या नावावर करण्यासाठी मंत्रालयातून मंजूरी आणली आहे. यास ग्रामस्थांनी विरोध केला असून ग्रामस्थांनी गावसभा घेवून शासनाने हा ठराव रद्द न केल्यास तीव्र अंदोलनाचा इशारा दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे, दिवशी बु॥ गावाच्या नावावर 750 एकर डोंगर शेतजमीन मिळकत आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्या मिळकतीचे सर्व व्यवहार गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र येवून पाहतात. मात्र गावातील ग्रामविकास मंत्रालयातील अवर सचिव भरत पाटील यांनी ग्रामस्थांना अंधारात ठेवून पदाचा गैरवापर करून सर्व मिळकतीचा कब्जा वडील आत्माराम गणपती सूर्यवंशी-पाटील यांच्या नावावर करण्यासाठी महसूल मंत्री व राज्यमंत्र्याकडे देवून याबाबत आदेश काढण्याच्या सुचना दिल्या आहे.

आजपर्यंत सर्व मिळकत दिवशी बु॥ ग्रामस्थांची असून ही ग्रामस्थांना विचारात न घेता महसुल राज्यमंत्र्यांनी आत्माराम पाटील यांना कब्जेदार म्हणून एकतर्फी आदेश काढला आहे. मंत्रालयात कार्यरत असणारे भरत आत्माराम पाटील यांनी कार्यालयीन पातळीवर हा आदेश मंजूर करून घेतला आहे. सर्व मिळकतीचे मुळ मालक हे दिवशी बु॥ गावातील सर्व ग्रामस्थ असताना त्यांनी खोटी कागदपत्रे सादर केली असून शासकीय पातळीवर त्याची शहनिशा झाली नाही? महसुल मंत्र्यांना अंधारात ठेवून मंत्रालयातील पदाचा वापर करून आदेश मंजूर करून घेतला आहे ? 750 एकर जमीनीची मिळकत ही मुळ मालकांच्या परवानगी शिवाय एक प्रशासकीय अधिकारी आपल्या वडीलांच्या म्हणजेच स्वत:च्या नावावर कशी करून घेवू शकतो असा प्रश्न ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे उपस्थिती केला आहे.

नुकतीच 31 डिसेंबर 2017 ला दिवशी बु॥ ग्रामस्थांनी गावसभा घेवून गावावर होणार्‍या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतेच जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून शासकीय पातळीवर योग्य ती दखल न घेतल्यास धरणे अंदोलन, भूक हरताळ, असहकार चळवळ अशा विविध पद्धतीने शासनास जागे करण्याचा ठराव घेण्यात आला आहे. शासनाने लवकरात लवकर लक्ष घालून शासकीय पदाचा गैरवापर करून धाक व दडपशाही, दमदाटी व अन्याय करणार्‍या व गावाची जमीन हाडपणार्‍या भरत आत्माराम पाटील यांच्यावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, महसुलमंत्री, ग्रामविकास मंत्री, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शंभूराज देसाई, जिल्हा पोलिस प्रमुख व तहसीलदार यांना दिली आहे.

No comments

Powered by Blogger.