स्टेट्स अपडेट जस्ट नाउ...


नमस्कार मित्रांनो,

अनेक तप लागतात आपल्या आयुष्यात येवून एक विशिष्ट स्तर (स्टेट्स) गाठायला. परंतु आता या सोशल नेटवर्कच्या जमान्यात मात्र, क्षणभरात आपण आपले ‘स्टेट्स’ बदलत असतो. कधी फिलिंग हॅपी तर कधी सॅड, अशा विविध प्रकारच्या भावना आपण या माध्यमातून व्यक्त करत असतो. यालाच सोशल नेटवर्किंगच्या जमान्यात माय स्टेट्स असं गोंडस नावाने संबोधण्यात येतं.

पूर्वीच्या काळी बंगला, चारचाकी, गलेलठ्ठ पगाराची नोकरी हे समाजात प्रतिष्ठेचं समजलं जायचं पण, आता या सोशल नेटवर्कींगच्या जमान्यात मात्र या सर्वाबरोबरच तुम्ही किती सोशल नेटवर्कींगचा वापर करता हेही पाहिले जाते. या नेटर्वकचा वापर करून काही लोक देशाचे प्रमुख हस्ती बनले आहेत. बदलत्या(5जी)च्या जमान्यात याचा खुबीने वापर करत आपले उदिष्ट साध्य करत आहेत. विविध माध्यमे विशेषतः तरुण -तरुणीच्या जीवनातील अविभाज्य घटक बनले आहेत. स्टेटसमधून त्या व्यक्‍तिच्या मनाचे प्रतिबिंब नजरेस येते. कोणी कसा आहे याचा अंदाज केला जातो. त्यामुळेच स्टेटस ठेवताना काही जण विचारपूर्वक स्टेटस ठेवतात. मात्र, काही फनी स्टेटसही दिसून येतात किंवा आवडता नेता, अभिनेता,अभिनेत्री यांचे फोटो,व्हिडिओ असोत किंवा रोमँटिक, इमोशनल नवीन, जुने साँग वा डायलॉग असतो ते स्टेट्स म्हणून ठेवले जातात. ‘आय अ‍ॅम नॉट लेझी, वर्क हार्ड, जिंदगी खुबसुरत है, एक दिन अपनी भी एंट्री शेर जैसे होगी, शोर कम और खौफ जादा होगा’ असे भले मोठे स्टेटसही ठेवले जातात. यातून आपल्या स्टेट्सरुपी भावना प्रकट करत असतात..तो दोस्तो अपने दिल के फिलिंगस को दबाके मत रखो उसे शेअर करो...

— अर्जुन काटवटे

No comments

Powered by Blogger.