मंत्रालयात कोळकीचा डंका; सरपंच सौ.रेश्मा देशमुख यांनी मनोगत व्यक्त करुन कोल्हापूर विभागातील पाच जिल्ह्यांचे प्रतिनिधीत्व केले. 


फलटण : विधानसभेचा बुलंद आवाज म्हणून माजी आमदार चिमणराव कदमांच्या तडाखेबंद भाषणांनी फलटण मतदारसंघ विधानसभेत प्रसिध्द आहेच. तसेच विद्यमान विधानपरिषद सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सर्व समावेशक धोरणांमुळे विधानपरिषदेतही फलटण प्रसिध्द आहे. त्यात आता मंत्रालयात कोळकीच्या सरपंच सौ.रेश्मा देशमुख यांनी कोल्हापूर विभागातील पाच जिल्ह्यांतील सरपंचांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त करुन कोळकीची पताका फडकावली आहे. सरपंचांना आपल्या गावाच्या विकासाचे गा-हाणे थेट मंत्रालयात येऊन मांडता यावे आणि शासकीय योजनांबाबत त्यांना मार्गदर्शनही मिळावे व त्यातून सरकार-सरपंच संवाद वाढावा या हेतूने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मंत्रालयात सुरू केलेल्या सरपंच दरबारात आज दोनशेहून अधिक सरपंचांनी हजेरी लावली.

दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मंत्रालयात हा सरपंच दरबार भरणार आहे. आजच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंकजा मुंडे होत्या. सरपंचांनी विशेषकरून घरकुल योजनेत येणार्‍या अडचणी, चौदाव्या वित्त आयोगातून मिळणारा निधी, ग्रामसभांमधील प्रश्‍न, आवश्यक असलेले अधिकचे मनुष्यबळ, सरपंचांची मानधनवाढ, ग्रामपंचायतींसाठी इमारतींची आवश्यकता असे विविध प्रश्‍न या वेळी मांडले. त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश मुंडे यांनी दिले.

No comments

Powered by Blogger.