राजुरी येथील विठोबा - बिरोबा यात्रा उत्साहात संपन्न


राजुरी :- राजुरी ता. फलटण येथील विठोबा - बिरोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या वर्षी भरवण्यात आलेल्या कुस्त्यांचे अनेकांनी कौतुक केले आहे. 
सदरचे विठोबा - बिरोबा मंदिर हे सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर आहे. या देवाची यात्रा प्रत्येक वर्षी माही पोर्णिमेला असते. यावेळी ही यात्रा कमिटीने योग्य नियोजन केले होते.
सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांच्या फंडातून बांधण्यात आलेल्या या विठोबा मंदिराच्या सभामंडपाचे उदघाटन व कुस्ती मैदानाचे उदघाटन विधानपरिषदेचे आमदार आर. जी. रूपनवर, आ. दिपक चव्हाण, मा. जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर,अॅड. भारत उराडे, हरणेश्वर अॅग्रो शुगर चे चेअरमन बाबासाहेब चवरे, फलटण तालुका सहकारी दुध संघाचे चेअरमन धनंजय पवार, भैरवनाथ सोसायटीचे चेअरमन डाॅ. बाळासाहेब सांगळे, युवा नेते योगीराज साळुंखे, उपसरपंच पै. भारत गावडे, राजाराम साळुंखे, राजुरी सोसायटीचे मा. चेअरमन सचिन आबासाहेब पवार, माजी सरपंच डाॅ. मधुकर माळवे, भैरवनाथ यात्रा कमिटीचे सदस्य कांतीलाल खुरंगे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल खुरंगे, राजुरी सोसायटीचे चेअरमन महादेव गावडे संचालक डि.एन. गावडे, पोपट हगारे, डाॅ. संदीप हगारे, युवा उद्योजक विनोद सांगळे, माजी उपसरपंच बाळासाहेब हगारे, संतोष हगारे आदींसह मान्यवर मंडळी उपस्थित होते.
या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या या रायदंडच्या विठोबा बिरोबा यात्रेला या वर्षी चांगले स्वरूप आले होते. यात्रा कमिटीने कुस्त्यांचे चांगले नियोजन केले होते. या कुस्त्यांसाठी भवानीनगर ता. इंदापूर , दहीगाव , फोंडशिरस माळशिरस, नातेपुते, फलटण, गोखळी, राजुरी भागातील मल्ल उपस्थित होते. यावेळी लहान मल्लांच्या चुनुकदार कुस्त्या झाल्या. यामध्ये कुमारी आरती घोरपडे या 12 वर्षाच्या मुलीने मुला बरोबर कुस्ती खेळली या कुस्तीची चर्चा त्यावेळी मोठ्या प्रमाणात झाली. या कुस्ती मैदानासाठी पंच म्हणून पै. भारत गावडे, पै. शरद गावडे, पै. सागर गावडे, पै. पांडूरंग पवार, पै. छगन गावडे, पै. माळवे , पै. दिनेश गावडे यांनी काम पाहिले.
लोक सहभागातून या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. या रायदंड च्या विठोबा बिरोबा याञेस सावळ, जललपूर , फोंडशिरस, आदींसह भागातील भक्त मंडळी उपस्थित होती.

चौकट
माणिकराव सोनवलकर यांनी शब्द पाळला.

रायदंड च्या विठोबा मंदिरास सभामंडप बांधून देण्याचा शब्द मा. जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी दिला होता.रायदंडवाडी येथे दोन विठोबा - बिरोबा मंदिरे आहेत. या पैकी एका मंदिराला माणिकराव सोनवलकर यांनी सभामंडप दिला आहे. मात्र या मंदीरा लगत दुसरे विठोबा मंदिर आहे. त्या मंदिरास सभामंडपाची आवश्यकता आहे. तरी या मंदीरास सभामंडप बांधून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

फोटो - उपस्थितांना मार्गदर्शन करताना धनंजय पवार, यावेळी आ. आर. जी. रूपनवर, आ. दिपक चव्हाण, माणिकराव सोनवलकर, डाॅ. बाळासाहेब सांगळे आदी मान्यवर मंडळी

No comments

Powered by Blogger.