वाळु माफियांकडुन माणगंगेचे लचके तोडणे सुरुच

 

म्हसवड :माण तालुक्यात वाळु तस्करांनी गेल्या काही वर्षा पासुन बेधडक पणे वाळु उपसा करून माणगंगेचे 'लचके' तोडले आहेत , हा प्रकार महसुल मधील काही झारीतील शुक्राचार्यामुळेच सुरू असल्याची चर्चा आहे , अनेक तलाठ्यांकडे नदीकाठची मोठ-मोठी गावे असुनही काहीच कारवाई न करणाऱ्यां तलाठ्यांवर नदीचे पंचनामे करून कारवाई करण्याची मागणी जनतेमधुन होत आहे तर उलट काही ट्रॅक्टर धारक शेतकऱ्यांना विनाकारण बळीचा बकरा बनवण्याच्या महसुलच्या हालचाली आहेत . तलाठ्यांवर कारवाया केल्या तरच वाळु तस्करी रोखण्यावर हेच जालीम औषध ठरू शकते .

माणगंगेच्या वाळुला काळे सोने म्हणून ओळखले जाते , परजिल्ह्यातुन या वाळुला मोठ्या प्रमाणात मागणी आहे , महसुल मधील काही कर्मचारी हाताशी धरून दिवसाढवळ्या बिनधास्त पणे वाळु उपसा केला जात होता सध्या वाळु उपसा बंद असला तरी काही दिवसांनी अशा महाभागामुळे तो पुन्हा सुरू होऊ शकतो , तरी याला काही कर्मचारी यांचा बोटचेपेपणाच कारणीभूत असल्याची चर्चा आहे ,

कोणतरी वजन वापरून काही घोटाळेबाज तलाठी इनकमच्या दृष्टीने महत्त्वाच्या गावात अनेक वर्षांपासून तळ ठोकून आहेत , स्वतः कधीही न कारवाई करणाऱ्यां शुक्राचार्यामुळेच वाळु उपसा सुरू आहे स्थानिक वाळु तस्कर दिवसभर ट्रॅक्टरच्या साहाय्याने दिवसभर वाळु उपसा करून साठा करत होते आणि तो साठा रात्री परजिल्ह्यातुन आलेल्या ट्रक व डंपर मध्ये भरून वाळू नेली जात असते , मात्र दिवसाढवळ्या वाळू भरली जात असतानाही तेथील तलाठी व सर्कल गप्प असण्याच कारण म्हणजे अर्थपुर्ण सबंध असल्याची चर्चा आहे , आणि अशा काही महाभाग कर्मचाऱ्यांकडुनच वाळु माफियांना प्रांताधिकारी व तहसीलदार यांच लोकेशन क्षणाक्षणाला दिल जाते त्यामुळे यामध्ये ऑफिस मधील काही कर्मचारी सामिल असल्याच बोलले जात आहे , त्यामुळे वाळु तस्कर चांगलेच मस्तावले आहेत , त्यात नोकरीशी प्रामाणिक राहुन काम करणाऱ्यां तलाठी , कोतवाल , सर्कल यांची मोठ्या प्रमाणात गळचेपी होत असुन अनेक वेळा त्यांच्यावर मोठ-मोठे हल्ले झाले आहेत , तर काहींना जिव गमवावा लागला आहे तर दुसरी कडे काहीही पुरावा नसताना काही ट्रॅक्टर धारक शेतकऱ्यांवर कारवाई करून त्यांना बळीचा बकरा बनवण्याच्या महसुलच्या हालचाली आहेत, उलट हजारो ब्रास वाळु जाई पंर्यत सबंधित गावचे तलाठी व कोतवाल काय करत होते ? प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व तहसीलदार सुरेखा माने हे कर्तव्य निष्ठ अधिकारी म्हणून ओळखले जातात मात्र वाळु तस्करांशी सामील असणाऱ्यां खालच्या कर्मचाऱ्यां मुळे महसुल खाते बदनाम होत आहे का ? असा सवाल जनते मधुन उपस्थित होत आहे त्यामुळे त्यांच्यावर प्रथम कारवाई करण्याची मागणी होत आहे तसेच नदीकाठच्या गावात व इनकमच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्यां गावातील तलाठ्यांच्या बदल्या केल्या तरच कुठे तरी वाळु तस्करी कमी होईल नाहीतर येरे माझ्या मागल्या प्रमाणे परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे तलाठ्यांच्या बदल्या करण्याची मागणी जनेतेमधुन जोर धरू लागली आहे .


वाळु तस्कर सैराट का ?


वाळु तस्करांना चिरीमीरी देऊन हाती मात्र भोपळाच राहत आहे , वाळु तस्करांना पोलिस व महसुल यांना मंथली देण्याबरोबर रात्री वाळु भरण्यासाठी तिप्पट पैसै , पोलीस व महसुलने गावोगावी एकजण हप्ते वसुलीसाठी नेमला असुन तो प्रत्येकी वैयक्तिक 500 रूपये महिना कमीशन घेऊन तो एका ट्रॅक्टरचे दोन्ही विभागाचे वेगवेगळे तिन - चार हजार रुपये घेऊन गोळाकरून पोहच करत असल्याची चर्चा आहे , तर आधी मधी कारवाई झाली तर लांखा पंर्यत दंड भरावा लागतो , त्यामुळे ह्या सर्वांना मलिदा पुरवून वाळु तस्करांना हाती भोपळाच राहत असतो त्यामुळे वैतागलेले तस्कर हल्ला करण्याचे धाडस करत असल्याचे बोलले जात आहे.


फक्त पळशीतच वाळु तस्करी होते का ?

काही दिवसांपूर्वी कोतवालावर हल्ला झाल्यानंतर प्रशासनाने पळशी येथे नदीचा पंचनामा केला असला तरी आंधळी पासुन देवापुर पंर्यत वाळु तस्करांनी माणगंगेचे लचके तोडले आहेत त्यामुळे अन्य गावांचे पंचनामे कधी होणार ? का फक्त पळशीतच वाळु चोरी झाली ? मग एका गावाला एक न्याय तर दुसऱ्यांला एक का ? या मध्ये काही आकस आहे का ? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत .बांधकाम करणाऱ्यांकडुन उकळपट्टी .


माणच्या पुर्व भागात एक नामचित घोटाळेबाज तलाठी सध्या सुरू असलेल्या बांधकाम धाराकडुन बंगल्याच्या कामासाठी ५० हजार तर व्यावसायिक बांधकामासाठी १ लाख रुपये वाळु कुठून आणली पंचनामा करू का ? असे म्हणून मलिदा गोळा करत असल्याची चर्चा आहे .अन् त्याच तलाठ्याने पत्रकारांच्या भेटीगाटीवर जोर दिला आहे .


( प्रतिक्रिया ) 

सध्या अवैध वाळु उपसा पुर्णपणे बंद असुन जर कोणी वाळु उपसा केला तर गंभीर कारवाई केली जाईल तसेच दोषी तलाठ्यांच्या बदल्या करण्याच्या सुचना तहसीलदारांना दिल्या असुन यापुढे ज्या मंडलात वाळु चोरी होईल त्यास संबधीत मंडलाधिकारी, तलाठी यांना जबाबदार धरले जावुन त्यांच्यावर कारवाई केली जाईल.


- दादासाहेब कांबळे , प्रांताधिकारी .
महसुल विभागाने प्रथम वाळु तस्करांशी सामील असणाऱ्यां सर्कल , तलाठी , कोतवाल यांच्यावर कारवाई करून त्यांच्या बदल्या केल्यास अवैध वाळु उपसा बंद होऊ शकतो .


- एक नागरिक .


No comments

Powered by Blogger.