पोटपाटाची कामे झाली नसल्याने तीनशे एकर क्षेत्र ओलिता पासून वंचीत


आदर्की .. धोम -बलकवडी उजव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रात शेरेचीवाडी ता फलटण गाव येते पण पोटपाटाची कामे झाली नसल्याने तीनशे एकर क्षेत्र ओलिता पासून वंचीत आहे तरी पोट पाटाची कामे पुर्ण करण्याची मागणी शेरेची वाडी ग्रामस्थानी निवेदनाद्वारे केली फलटण तालुक्यातील शेरेची वाडी गाव धोम -बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याख्याली लाभ शेत्रात येते , धोम -बलकवडी उजव्या कालव्यातून डिसे बर 2०११ पासून शेतीसाठी आवर्तन सुटत आहे परंतु शेरेची वाडी येथिल मायनर कमांक ३० चे काम पुर्ण झाले नाही त्यामुळे शेतकरी वर्गाचे तीनशे एकर क्षेत्र ओलीतापासून वंचीत आहे तरी पोट पाट ( मायनर ) चे काम पुर्ण करण्याची मागणी शेतकरी वर्गार्ता निवेदनाद्वारे धोम -बलकवडी प्रकल्प अभियंताच्या कडे केली आहे यावेळी सरपंच शामराव कणसे , शिवाजी घाडगे ,पोलीस पाटील प्रथमेश सुर्यवंशी , दिलीप मोरे , अर्जुन कणसे , यशवंतराव सुर्यवंशी , सागर काटकर , बजरंग गोपनवर, प्रल्ह|द गायकवाड , आदी शेतकरी
उपस्थित होते

No comments

Powered by Blogger.