गावोगावी फिरुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात बहुरुपी


म्हसवड आपल्या महाराष्ट्र राज्याला संताची भुमी म्हणुन ओळखले जाते अगदी त्याप्रमाणेच महाराष्ट्रातील ग्रामीण भागाला लोककलेचा वारसा जोपासणारी संस्कृती म्हणुनच ओळखले जाते, ग्रामीण भागातील हीच लोककला जोपासण्याचे काम करणार्या काही कलावंतावर सध्या उपासमारीची वेळ आली असुन राज्याची शान असलेली बहुरुपी ही कला व ती सादर करणारे कलाकार सध्या गावोगावी फिरुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत, त्यांच्याकडे वेळीच शासनाने लक्ष देवुन ही कला जिवंत ठेवण्याचे काम करावे अन्यथा काळाच्या ओघात ही लोककला नामशेष होण्याची भिती या कलाकारांतुन व्यक्त होत आहे.
निसर्गाने प्रत्येक व्यक्तीच्या अंगी काहीना काही कला ही दिलेली आहेे ही कला ज्याला उमजते तो त्या कलेला न्याय देण्याचा नेहमीच प्रयत्न करतो काहीजण तर आपल्या अंगातील कलेला लोककलेचा दर्जा देतात अन त्या कलेसाठीच आपले संपुर्ण आयुष्य वाहुन घेतात बहुरुपी या कलेसाठी असेच आपले संपुर्ण आयुष्य वाहुन घेतलेला एक बहुरुपी कलावंत बाबाजी शेगर याला बोलते केल्यावर त्याची कहाणी ऐकुन अनेकांची बोलती मात्र बंद झाली बहुरुपी ही लोककला काळाच्या पडद्याआड जाण्यापुर्वीच सामाजीक व शासन स्तरावरुन विषेश प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे या कलाकाराचे म्हणणे आहे.

सध्या माण तालुक्यात माळशिरस येथील पोलिस वेशातील बहुरुपी फिरत आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात घरोघरीं ,शाळा अशा ठिकाणी जाऊन विविध शब्दांची फेक करीत भल्या भल्या माणसांनाही घाबरवून सोडतात.तर काही ठिकाणी हातवारे, चेहऱ्यावरचे हावभाव यांच्या माध्यमातून मुलांना सळो की पळो करून आपली बहुरुप्याची भूमिका जिवंत साकार करतात तसेच काही ठिकाणी "

" चला काकू चला, आता लग्नाला चला,

पोर बांधा खांबाला,कुत्री घ्या काकला

सासऱ्यच्या माझ्या लग्नाला चला....

अशी गीते गाऊन जनतेची करमणूक करीत असतात.पूर्वीच्या काळी बहुरूपयसह नंदीवले, गारुडी, पिंगळा जोशी, वासुदेव या पारंपरिक कलाना समाजात विशेष स्थान दिले जात होते परंतु काळाच्या ओघात या कला लोप पावत आहेत.बहुरूपी बाबाजी याने सांगितले की ,शहरी भागात या कलाना थोडा तरी मान आहे परंतु ग्रामीण भागात मात्र या कलेची टिंगलटवाळी केली जात असल्याची खंत व्यक्त केली.या कलेसाठी आमचे पणजोबा गंगाराम,आजोबा,देवराव,वडील अर्जुन शेगर यांनी आयुष्य खर्ची केले व ही कला जिवंत ठेवली .त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ही कला अशीच जिवंत ठेवु अशी आशा व्यक्त केली.या पारंपरिक कला हे महाराष्ट्राचे भूषण असून या कला टिकल्या तरच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची संस्कृती जोपासली जाईल.म्हणून शासनाने कलेला उत्तेजन देऊन पारंपरिक कला करणाऱ्या कलाकारांचा सन्मान करावा अशी अपेक्षा कलावंत बाबाजी यांनी व्यक्त केली.

No comments

Powered by Blogger.