शासनातर्फे देण्यात येणा-या पोलिओ डोसचा फायदा घ्या. उपसभापती – संजय साळुंखे


पिंपोडे बु|| – प्रत्येक बाळाला पोलिओ डोस देण्यासाठी शासनाने संपूर्ण राज्यामध्ये व देशात पोलिओ निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत देण्यात येणा-या पोलिओ डोसचा सर्वानी आपल्या बालकासाठी डोस घेवून लाभ घ्यावा असे कोरेगाव तालुका पंचायत समितीचे उपसभापती संजय साळुंखे यांनी व्यक्त केले.

पिंपोडे बु|| ता.कोरेगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मराठी शाळेमध्ये १ रस ५ वयोगटातील बालकाना त्यांच्या हस्ते पोलिओ डोस देण्यात आला. यावेळी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य दिपक निकम, जेष्ठ कार्यकर्ते अविनाश लेंभे, शानूभाई इनामदार , बाळासाहेब गार्डी, राजू कदम आदि उपस्थित होते.

यावेळी उपसभापती साळुंखे म्हणाले की प्रत्येक माता पित्यानी आपल्या बालकाच्या आरोग्यासाठी शासनाने सुरु केलेल्या पोलिओ निर्मूलन अंतर्गत पोलिओ डोस उपक्रम चालू केल्याचा सर्व बालकांना लाभ दया.

यावेळी सरपंच नैनेश कांबळे , धनसिंग साळुंखे , हनमंत साळुंखे , पांडुरंग मदने , विजय मदने तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ , महिला उपस्थित होत्या.

No comments

Powered by Blogger.