भोजलिंग शेजारच्या बेवारस वाळुचा गाॅडफादर कोण ?


म्हसवड :- सध्या माण तालुक्यात वाळु उसा ' चोरी चोरी , चुपके चुपके ' असुन आटपाडी व माण तालुक्याच्या सिमेवर असलेल्या भोजलिंगाच्या पायथ्याला दोन दिवसांपूर्वी पाच-सहा डंपर वाळु पडली असुन ह्या वाळुला एका वाळुतस्करांचा गाॅडफादर असलेल्या एका तलाठ्यांने झेड-प्लस सुरक्षा दिल्याची चर्चा आहे.

सध्या माण तालुक्यात वाळु तस्करी थंडावली असली तरी काही ठिकाणी वाळु उपसा ' चोरी चोरी , चुपके चुपके ' सुरू असुन महसुल विभागाने अनेक पथके तयार करून वाळुउपसा रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत , याचा वाळु तस्करांनी चांगलाच धसका घेतला असला तरी माण मधील एका वाळु तस्करांचा गाॅडफादर तलाठ्यांने सबंधित डंपरला संरक्षण दिल्याची चर्चा आहे , ती वाळु म्हसवड परिसरात माणगंगा नदीपात्रातुन भरून डंपर मध्ये भरून चार दिवसापूर्वी या दोन तलाठ्यांनी डंपर सोबत राहुन महसुलची सर्व जबाबदारी घेतली होती ,हि वाळु आटपाडी व माण तालुक्याच्या सिमेवर प्रसिद्ध देवस्थान असलेल्या भोजलिंगाच्या डोंगराच्या पायथ्याशी सहा-सात डंपर वाळु टाकली आहे , जिल्हाधिकारी यांनी नुकतीच महसुल मधील सर्वांचे कान टोचले आहेत , मात्र सबंधित तलाठ्यांना जिल्हाधिकारी यांनी मोठा औषध उपचार करण्याची गरज भासु लागली आहे , सबंधितानी वाळु एका मित्रांसाठी टाकली असल्याची चर्चा आहे 

ही वाळु माण तालुक्याच्या सिमेवर कमी वर्दळीच्या ठिकाणी टाकली आहे ,वाळू टाकताना सबंधित तलाठ्यांनी झेड-प्लस सुरक्षा दिली आहे त्यात वरिष्ठ अधिकारी कोण सामील आहेत का ? त्या बदल्यात मलिदा किती जणां पंर्यत पोहचला ? यांना महसुलने संरक्षण देणे म्हणजेच कुंपनाने शेत खाल्याचा प्रकार आहे का ? यात एका तलाठ्याचा सहभाग होता तर त्यांच्यावर कारवाई होणार का ? अधिकाऱ्यां पंर्यत मलिदा पोहचतो म्हणूनच तलाठ्यांवर कारवाई होत नाही का ? आता तरी कारवाई होणार का ? जिल्हाधिकारी लक्ष देणार का ? असे अनेक सवाल सर्व सामान्यांमधुन उपस्थित केला जात असुन सबंधित तलाठ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची तसदी महसुल विभाग करणार का ? हा येणारा काळच ठरवेल.


( चौकट )


"त्या" तलाठ्यांचे बगलबच्चे सैरावैरा !


माण मधील त्या तलाठ्यांचे कारनामे पेपरमध्ये गेल्या काही दिवसांपासून छापुन येत असल्याने तलाठी चांगलेच बिधरले असुन त्यांच्या बगलबच्यांनी पत्रकारांच्या भेटीगाटीवर जोर दिला असुन बातम्या थांबवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.


जिल्हाधिकार्यांच्या झाडाझडतीनंतरही वाळु उपसा सुरुच ।


चार दिवसांपुर्वी पुसेगांव येथे जिल्हाधिकारी सातारा यांनी सर्वच तलाठ्यांची एक बैठक घेवुन त्यामध्ये जिल्ह्यात बेकायदेशीर सुरु असलेल्या वाळु उपसा संदर्भात तलाठ्यांना जाब विचारला होता, यावेळी माण तालुक्यात सुरु असलेल्या वाळु उपशा संदर्भात एका तलाठ्याला भर बैठकीत उभे करुन याविषयी जाब विचारत त्याला चांगलेच धारेवर धरले होते, त्यानंतर दुसर्याच दिवशी भोजलिंग पायथ्यालगत असा वाळु साठा दिसुन आल्याने जिल्हाधिकारी यांच्या झाडाझडतीनंतरही वाळु उपसा सुरुच असल्याची महसुल विभागातच चर्चा सुरु आहे.

No comments

Powered by Blogger.