तांबवे येथे अखंड हरिनाम सप्ताह व व्याख्यानमालेचे आयोजन


आरडगांव :- तांबवे ता फलटण येथे दि १४ फेब्रुवारी ते २१फेब्रुवारी २०१८ रोजी अखंड हरिनाम सप्ताह व व्याख्यानमालेचे आयोजन करणेत आले आहे. सदर सप्ताहामध्ये राज्यातील ज्ञानेश्वर महाराज पठाडे,
शामगावकर आप्पा, प्रवीण महाराज शेलार ,प्रदीप महाराज नलावडे व विविध कीर्तनकार व प्रबोधनकार यांचे कीर्तन होणार आहे.
सप्ताहाच्या व्यासपीठावर कायापालट व्याख्यानमालेचे दुसरे वर्ष आहे. यामध्ये विविध विषयांवर डॉ संजय शिवदे, मा विजयसिह जाधव, BDO, फलटण, मा योगेश बाग, RTO, सातारा, मा सुजीत बर्गे, sales टॅक्स इन्सपेक्टर, डॉ देवेंद्र जाधव, पशु उपयुक्त ,सातारा व मा सुरेश खोपडे, IPS, (retired) यांची व्याख्यानमाला होणार आहे.
या निमित्त विविध उपक्रम यामध्ये ह भ प शाम गावकर आप्पा यांचा नागरी सन्मान, गावातील पंच्यातरी पूर्ण केलेल्या नागरिकांचा सत्कार दिंडी यांचे आयोजन केले आहे. वाचन संस्कृती वाढावी यासाठी ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचनासाठी गावातील प्रत्येक घरातून एक वाचक बसणार आहे. तरी याचा परीसरातील सर्वांनी लाभ घेणेचे आवाहन तांबवे समस्थ ग्रामस्थांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.