खड्ड्यांचा अंदाज न आल्याने गाडीचा अपघात


बारामती- फलटण मार्गावर खड्ड्यांचा अंदाज न आल्याने चार चाकी बोलेरे एमएच 10 एजी 145 या क्रमांकाच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या अपघातात गाडी रस्त्याच्या कडेला ऊसाच्या शेतात जाऊन पडली. या घटनेत वाहनचालक जखमी असून त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्याने बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार आर.जी.मखरे यांनी घटनेस्थळी धाव घेतली. घटनेचा तपास पोलीस हवालदार एम.ए.चव्हाण, आर.जी.मखरे करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

No comments

Powered by Blogger.