फलटण : ऊस ट्रॉलीच्या धडकेत १ ठार


फलटण : आसू, पवारवाडी (ता. फलटण) येथे उसाच्या ट्रॉलीला धडक बसून एक जागेवरच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, बाळासाहेब ज्ञानदेव गाडे (वय ५०) हे मोटारसायकलवरून शुक्रवार दि. २ रोजी सायंकाळी ७ च्या दरम्यान पवारवाडी येथील शेताकडे जात होते. रस्त्यावर उसाचा ट्रेलर उभा होता. त्या ट्रेलरवर जाऊन धडकल्‍याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

No comments

Powered by Blogger.