फलटणमध्ये बँक कर्मचाऱ्याची विष पिऊन आत्महत्या


फलटण : फलटण येथे बँक कर्मचार्‍याने विष प्राशन करून आत्‍महत्या केली. निलेश हरिभाऊ शिंदे (वय ३० रा. गोळीबार मैदान, फलटण) असे मृत युवकाचे नाव आहे. आत्‍महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून यावरून तर्कवितर्क व्यक्‍त होत आहेत.

निलेश याने आज विषारी औषध प्राशन करून आत्‍महत्या केली. निलेश शहरातील एका र्बॅकेत नोकरी करत होता. याप्रकरणी अद्याप पोलिसांत गुन्‍हा नोंद झाला नाही. तसेच आत्‍महत्येचे ठिकाण व वेळ समजू शकली नाही.

No comments

Powered by Blogger.