आरती घोरपडे हिच्या कडून भोर येथील महिला दुहेरी पट डावावर चितपट


राजुरी दि. धुळदेव ता. फलटण येथे खास महीलांच्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुंजवडी येथील कु. आरती मोहन घोरपडे हिने भोर येथील महिला पैलवानास दुहेरी पट डावावर चितपट केले . 
आरती घोरपडे ही राजुरी येथील कर्मवीर कुस्ती केंद्रात वस्ताद पै. नवनाथ खुरंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. या तिच्या कामगिरी बद्दल मुंजवडी व राजुरी येथील ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments

Powered by Blogger.