तळमावलेतील दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार


ढेबेवाडी : ढेबेवाडी विभागातले अनेकांचे संसार उध्वस्त करणारी व सामाजिक स्वास्थ बिघडवणारी तळमावले येथील दारूची दुकाने कायमची बंद करा, अशी मागणी करणारा ठराव ताईगडेवाडी (तळमावले) ता.पाटण येथील महिला ग्रामसभेत केला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर ताईगडेवाडी ग्रामपंचायतीच्या महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.शोभा संजय भुलूगडे होत्या.सभेस 125 वर महिलांची उपस्थिती होती.

सभेत महिला सक्षमीकरण, रोजगार, आरोग्य,अतिक्रमण, महिला आरोग्य तपासणी व उपचार,आदी विषयावर सविस्तर चर्चा झाली मात्र दारूबंदी या विषयावर जोरदार चर्चा झाली. त्यानुसार तळमावले हे संपूर्ण ढेबेवाडी विभागाचे मध्यवर्ती ठिकाण आहे, मोठी व विस्तारित बाजारपेठ आणि शाळा, विद्यालय, महाविद्यालय आहेत, विभागातली हजारो मुले मुली शिक्षणासाठी येतात, बसस्थानकाच्या परिसरात रस्त्यालगत व नव्या गावठाणात मध्यभागी असलेल्या परवानाधारक दुकानामुळे तसेच काही चोरट्या दारू विक्रेत्यामुळे येथे मुबलक दारू मिळते,शालेय विद्यार्थ्यांवर व आसपासच्या कुटूंबातल्या महिला व मुली,विद्यार्थिनी, व अन्य घटकांना त्रास होतो,दारूड्यांच्या वादावादी, व मोठ्याने होणार्‍या भांडणे व शिवीगाळीने शांततेचा व सामाजिक स्वास्थ्याचा भंग होतो होतो,शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी व्यसनी होण्याचा धोका आहे.

म्हणून इथे असलेली सर्व दारू दुकाने बंद करण्यात यावीत,व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात संपुर्ण दारूबंदी करावी अशी अनेक महिलांनी चर्चेतून मागणी संबधित यंत्रणेकडे करावी असा ठराव एकमताने केला. चर्चेत सदस्य सौ.मालन ताईगडे व सौ.मंदाकिनी करपे,आणि सौ.प्रमिला पाटील,प्रियंका ताईगडे,वैशाली ताईगडे,सौ.रेश्मा मुल्ला,रंजना माळी,मंगला जाधव,आदीनी सहभाग घेतला,सरपंच सौ.शोभा भुलुगडे यानीही या मागणीस दुजोरा दिला व ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

No comments

Powered by Blogger.