पत्तयांच्या जुगार अड्ड्यावर छापा


पाचगणी :-  पांचगणी -खिंगर रोडवर एका बंगल्यात पत्तयांच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पांचगणी पोलिसानी रोख ६४ हजार रुपयासह ११ आरोपीना ताब्यात घेतले आहे. या आरोपींवर मुंबई जुगार प्रतिबंध अधिनियम प्रतिबंधान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पांचगणित खळबळ उडाली आहे.

याबाबत पांचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की खिंगर पांचगणी रोडवर असणाऱ्या सना पॅरॅडिसी नावाच्या मुश्ताक इब्जी यांच्या मालकीच्या घरात पत्त्यांचा जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना आज मिळल्यानंतर पांचगणीच्या सपोनि तृप्ती सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने या घरात छापा टाकला. यावेळी पत्त्यांचा डाव चालू असल्याचे निदर्शनास आले या पथकाने लागलीच जुगार खेळणाऱ्या ११ आरोपीना मुद्देमालासह ताब्यात घेतले.

यामध्ये रुपेश खुंटवड( भोर पुणे) , मोहन गायकवाड , तात्या पवार (पाचवड वाई) , मारुती जाधव, राजेंद्र भंडारी (पांचगणी) , प्रवीण शेटे, सतीश शेटे, निलेश देशमाने ,अशोक शेटे , किशोर आराळे (सर्व रा. भोर पुणे) महंमद रफिक मुलांनी (महाबळेश्वर) या आरोपीना रोख ६४ हजार २० रुपयांसह अटक केली आहे.

या मोहिमेत पांचगणी पोलीस ठाण्याच्या सपोनि तृप्ती सोनावणे व वाईचे सपोनि शशिकांत बर्गे यांचेसह जितू कांबळे, रवींद्र ठोंबरे, सुरज गवळी,प्रमोद फरांदे, वैभव भिलारे, अभिजित घनवट, अभिजित घनवट, किरण चिकने, पामरे, प्रवीण महागडे, कृष्णा पवार यांच्या पथकाने हा छापा टाकला आहे. या अकरा आरोपींवर मुंबई जुगार प्रतिबध अधिनियम कल ४ /५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास सपोनि तृप्ती सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली मच्छीन्द्र सावंत व त्यांचे सहकारी करित आहेत.

No comments

Powered by Blogger.