शरदचंद्र पवार महाविद्यालयातील विद्यार्थी परिषद सचिवपदी प्रतीक दिलीप शिंदे याची निवड


आरडगांव :- लोणंद ( ता. खंडाळा ) येथील रयत शिक्षण संस्थेच्या शरदचंद्र पवार महाविद्यालयात बुधवार दि. २४ जानेवारी २०१८ रोजी विद्यार्थी परिषद सचिवपदाची निवडणूक घेण्यात आली. विद्यार्थी परिषदेच्या १४ सदस्यांनी मतदान केले. सर्वाधिक मते मिळवून प्रतीक दिलीप शिंदे (बी.एस्सी भाग २) याची विद्यार्थी परिषद सचिवपदी निवड झाली. प्राचार्य डाॅ. टी. एन. घोलप यांनी प्रतीकचे अभिनंदन केले. या निवडणूकीसाठी विद्यार्थी परिषदेचे चेअरमन प्रा. आर जे नाळे, प्रा.एम डी नायकू व प्रा.सौ. के के गायकवाड यांनी काम पाहिले.

No comments

Powered by Blogger.