घाडगेवाडीयेथे महाशिवरात्र फराळाचे वाटप


आदर्की .. वेळ सकाळी ७ची , घाडगेवाडीत लगभग घरोघरचे दुध गोळा केले जात होते , बनेश्वर मंदीरात
अभिषेक व दर्शनार बारीची लगभग , तर तिनशे किलो शाबू , दोनशे किलो शेगांदाणे , मिरची , मिठ , तेल यांची खिचडी , दोन टन केळी , मसाले दूध , पाण्याचे पाऊच घेवून घाडगेवाडी ग्रामस्थ , तरुण मंडळे फलटण -सातारा रस्तावरील प्रत्येक वाहनांना आदर पुर्वक थांबवुन शिवभक्ताना फराळाचे वाटप केले घाडगेवाडी ता. फलटण येथे गत १२ वर्षापासून प्रसादउद्योग समुहाचे संस्थापक दशरथ बोबडे यांचे मार्गदर्शनाखाली घाडगेवाडी ग्रामस्थ व बनेश्वर तरूण मंडळ व गावातील तरूण मंडळे एकत्र येवुन फराळ वाटप केले घाडगेवाडी येथे गत बारा वर्षापुर्वी चाकरमानी व ग्रामस्थ यांनी येवुन भव्य दिव्य बनेश्वर मंदीर उभारुन पारायण सोहळा सुरु केला त्याबरोबर फराळ वाटपाचा कार्यकम सुरू केला तो अखंडपणे सुरु आहे कार्यकम यशस्वी पणे पार पाडण्यासाठी प्रसाद उद्योग समुहाचे दशरथ बोबडे ( आबा ) , दादासो साप्ते , प्रमोद बोबडे , माणिक बोबडे , हणमंत बासर , अरूण
बोबडे , दत्तात्रय पवार , प्रसाद बोबडे पैं . शंभूराज बोबडे , पोलीस पाटील हेमंत भोसले , बनेश्वर मित्र मंडळ व इतर मंडळाच्या कार्यकर्त्यर्ना परिश्रम घेतले

No comments

Powered by Blogger.