आ. शशिकांत शिंदे यांच्या शिष्टाईनंतर उपोषण मागे


कोडोली : सातारा शहरालगतच्या नवीन औद्योगिक वसाहतीमधील देगाव फाटा ते कूपर कंपनीपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था व व्यावसायिकांची अतिक्रमणे काढण्याबाबत औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेले अ‍ॅड. विजय देशमुख व सोमनाथ जाधव यांना याबाबत तातडीने कार्यवाही करण्याबाबत लेखी आश्‍वासन मिळाल्याने उपोषणकर्त्यांनी आ. शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांच्या हस्ते लिंबू सरबत घेवून उपोषण मागे घेतले.

उपोषण कर्त्यांबरोबर आ. शशिकांत शिंदे व म.औ.वि.मंडळाचे उपअभियंता विठ्ठल राठोड, सार्वजनिक बांधकामचे मोहिते यांच्यात चर्चा होवून रस्त्याच्या दुरुस्तीबाबत तातडीने टेंडर काढणे, देगाव फाटा ते अमरलक्ष्मी चौकापर्यंत व्यावसायिकांनी केलेली तात्पुरती अतिक्रमणे दि. 5 फेब्रुवारी पासून काढण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले. रस्त्यावर ज्यांनी कायमस्वरुपी अतिक्रमणे केली आहेत त्यांची अतिक्रमणे काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, औद्योगिक विकास महामंडळ, तहसीलदार व सातारा शहर पोलिस यांची पुढील आढवड्यात संयुक्त बैठक घेण्याचे ठरले.

No comments

Powered by Blogger.