प्रत्येक कुटुंबात एलपीजी गॅसचा वापर व्हावा


कोयनानगर :-  प्रत्येक कुटुंबात एलपीजी गॅसचा वापर व्हावा.प्रत्येक नागरिकाला शासनाच्या विविध योजनाची माहिती असावी.यासाठी केंद्र सरकार तर्फे पंतप्रधान एलपीजी पंचायत ही योजना सुरू करण्यात आले आहे या लोकोपयोगी योजनेचा फायदा पाटण तालुक्यातील सर्व जनतेने घ्यावा असे आवाहन गणेश कारवार यांनी केले.

युनिटी गॅस एजन्सी हेळवाक यांच्यावतीने आयोजित कोयनानगर येथील करमणूक केंद्रात पंतप्रधान एलपीजी पंचायत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती राजाभाऊ शेलार ,शिवसेना उपजिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार ,भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी प्रमुख आयेशा सय्यद ,फत्तेसिंह पाटणकर ,शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र पाटील ,नंदकुमार सुर्वे ,अशोकराव पाटील ,राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष सेन्हल जाधव आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

गणेश कारवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच कोयनानगर येथे युनिटी गॅस एजन्सीचे प्रमुख जॉन्सन कूटॅटो यांनी प्रथमच या योजनेचा शुभारंभ केला आहे. यावेळी उपस्थित आसलेल्या महिला वर्गाला उज्वला योजनेतुन गॅस जोडणी कशी मिळवावी या योजनेत मागास घटकासाठी बँकेचे अर्थसाहय आदी बरोबर गॅसचा सुरक्षित वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सर्वांचे स्वागत जॉन्सन कुटॅटो तर आभार क्रिस्टिना कुटॅटो यांनी मानले.

No comments

Powered by Blogger.