मोतीबिंदु मुक्त माणदेश अभियानाची सुरुवात


मायणी :- भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आरोग्य फाऊंडेशनचे वतीने दि.२६ रोजी मार्डी ता माण येथे मोतीबिंदू मुक्त माणदेश या अभियानाची सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.राहूल दोलताडे यांनी दिली.
माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व जि.प.सदस्या सौ. सोनाली पोळ, पं.स.सभापती, रमेश पाटोळे, वैद्यकिय अधिकारी समीर तांबोळी यांच्या प्रमुख उपस्थितित या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी रुग्णांची मोफत नेत्र तपासणी, मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी करण्यात आली. ज्या रुग्णांना मोतीबिंदू आहे अशा सर्व रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया होणार आहे. प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी प्रा. आ केंद्र मार्डी येथे व प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी मायणी येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर होणार आहे. यावेळी आरोग्य फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॅा राहुल दोलताडे, डॅा उमेशजी आहेर,डॅा निलेश गायकवाड,डॅा हितेश गायकवाड,डॅा कार्तिक नरवडे पाटील, डॅा पराग ननावरे,डॅा अनिकेत साबळे,डॅा निलेश बरिदे आदि मान्यवर उपस्थित होते.
माण-खटाव या कायमस्वरुपी दुष्काळी भागात अनेक आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत.त्यातच वयस्कर लोकांमध्ये अंधत्वाचे प्रमाण वाढत आहे.आरोग्य फांऊडेशनने संपूर्ण तालुक्याचा आढावा घेतला व असे लक्षात आले की अंधत्वाचे प्रमुख कारण मोतीबिंदू आहे . मोतीबिंदू सारख्या आजारावर मात करण्यासाठी तळागळातील लोकांमध्ये जाण्याची गरज आहे .त्यामुळे अशा वृद्ध व गरीब लोकांसाठी आरोग्य फांउडेशनचे मोतीबिंदू मुक्त माणदेश अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.

या अभियानाअंतर्गत माण व खटाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर होणार आहे.तरी माणदेशातील सर्व नागरिकांना विनम्र आवाहन करण्यात येते की आपण सर्वांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घ्यावी.
माजीआयुक्त प्रभाकर देशमुख म्हणाले की,आरोग्य फाउंडेशनने सूरू केलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.माणदेशातील सर्व गरीब व गरजू रुग्णांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले .या अभियानामुळे माण व खटाव तालुक्यातील अंधत्व कमी होण्यासाठी मदत होईल त्यांनी आरोग्य फाउंडेशनचे कौतुक केले.

सौ .सोनालीताई पोळ म्हणाल्या की , मोतीबिंदू मुक्त माणदेश हे अभियान गोरगरीब लोकांसाठी एक वरदान आहे.सर्वांनी या उपक्रमाची माहिती गरजू लोकांपर्यत पोहोचवावी.आरोग्य फाऊंडेशन ने चांगला उपक्रम चालू केला असून फाऊंडेशनला आपण सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

सभापती रमेश पाटोळे म्हणाले की , या अभियानाची माहिती गरजू व गरीब लोकांपर्यंत देण्याचे कार्य आपण सर्वांनी केले पाहिजे. तालुक्यामध्ये मोतीबिंदूची समस्या वाढत आहे त्यामुळे या उपक्रमाचा समाजासाठी चांगला फायदा होईल . त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व यापुढे आरोग्य फाउंडेशनला आपण मदत करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले .

आरोग्य फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॅा राहुल दोलताडे यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments

Powered by Blogger.