रामचंद्र सखाराम संकपाळ यांचे निधन


वाठार स्टेशन : वाठार स्टेशन येथील रामचंद्र सखाराम संकपाळ वय ९३ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.रामचंद्र संकपाळ हे महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरदेखील ट्रक व ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांच्या अतिशय जवळचे असे व्यक्तिमत्त्व होते.सातारा जिल्ह्यात हँडल इंजिन ट्रक घेणारे व चालविणारे पाहिले ट्रक मालक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.आता पर्यंत त्यांनी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी २६७ ट्रक खरेदी करण्याचा विक्रम केला आहे.त्यांचे सर्व कुटुंबीय याच व्यवसायात आजही कार्यरत आहेत. रामचंद्र संकपाळ यांना लोक दादा असे म्हणत.दादांचे गाव सर्कलवाडी पण वाठार स्टेशन येथे येऊन त्यांनी अपार कष्ट करून ट्रक व्यवसायावर आपले कुटुंब सावरले व स्थिर केले.त्यांच्या पश्चात पत्नी,पाच मुले,दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने वाठार स्टेशन पंचक्रोशीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या अंत्यविधीला सर्व क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होत्या.दशक्रिया विधी गुरुवार ०८/०२/२०१८ रोजी घेण्यात आला आहे.

No comments

Powered by Blogger.