माझ्या निधनाची अफवा : मंगला बनसोडे


कराड : तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडे यांचे पती रामचंद्र बनसोडे यांचे गेल्‍या काही दिपसांपूर्वी निधन झाले. त्‍यांच्या निधनाच्या काही दिवसातच मंगला बनसोडे यांचेही निधन झाल्‍याचे वृत्‍त शोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, अशी कोणतीही घटना घडली नसल्‍याचे मंगला बनसोडे यांनी ऑनलाईन पुढारीशी बोलतना सांगितले.

त्‍या म्‍हणाल्‍या, ‘‘माझे पती रामचंद्र बनसोडे यांचे बुधवारी दुपारी निधन झाले. आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र, अशा प्रसंगात काही लोकांनी मंगला बनसोडे यांचे निधन झाले अशा अफवा पसरवल्या असून, मी ठणठणीत आहे. सोमवारी सायंकाळी मेंढा (वरोशी ता.जावली जि.सातारा ) येथे १५० कलाकारांसह माझा तमाशा होणार आहे.’’

No comments

Powered by Blogger.