बजरंग खटके यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजारत्न पुरस्कार जाहीर


देशभरातील तमाम धनगर समाजबांधवांची वैचारिक चळवळ म्हणून उदयास आलेल्या आणि संपुर्ण देशाच्या साहित्यिक व सासंकृतिक विश्वाचे लक्ष वेधून घेणा-या, ‘धनगर साहित्य परिषद’ आयोजित “दुस-या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे” अत्यंत मानाचे “पुरस्कार” जाहीर झाले असून, मा. श्री. आण्णासाहेब डांगे यांना “जीवनगौरव”, तर आ. रामराव वडकुते यांना थोरले सुभेदार मल्हारराव होळकर “जेष्ठ समाजसेवक” पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. तसेच मा. श्री. बजरंग खटके यांना महाराजा यशवंतराव होळकर “समाजरत्नं” पुरस्कार, डॉ. इंद्रकुमार भिसे यांना शुरवीर विठोजीराव होळकर “क्रांतीरत्न” पुरस्कार तर मा. श्री. मारुती जानकर यांनाही स्व. बी. के. कोकरे “समाजभुषण” पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. विशेष म्हणजे यंदा आद्य महिला स्वातंत्र्यसेनानी भिमाबाई होळकर यांच्या नावानेही पुरस्काराची स्थापणा करण्यात आली असून, मा. सौ. शुभांगी अशोकरावजी बन्नेनवर या आद्य महिला स्वातंत्र्यसेनानी भिमाबाई होळकर पुरस्काराच्या पहिल्या मानकरी ठरल्या आहेत. त्याशिवाय इतर महापुरुषांच्या नावानेही स्थापण करण्यात आलेल्या विविध पुरस्कारांचे वितरणं लातूर येथे होणा-या दुस-या ऐतिहासिक आदिवासी धनगर साहित्य संमेलनात होणार आहे.

दरवर्षीप्रमाणे धनगर साहित्य परिषदेकडून, आदिवासी धनगर साहित्य संमेलनात देण्यात येणा-या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, समाजाच्या उन्नती अन् प्रगतीसाठी सदैव प्रयत्नं करणा-या समाजातील आदर्श व्यक्तिमत्वांचा लातूर येथे सर्व समाजबांधव आणि मान्यवरांच्या हस्ते हे अत्यंत मानाचे आणि प्रतिष्ठेचे पुरस्कार देवून गौरव केला जाणार आहे. अशी माहिती धनगर साहित्य परिषदेचे अध्यक्ष मा. श्री. जयसिंगतात्या शेंडगे, आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. श्री. अभिमन्यू टकले आणि दुस-या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष मा. अँड. श्री. आण्णारावजी पाटील यांनी प्रसिद्दीविभागास दिली आहे.

समाजातील गुणवंतांना पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी, धनगर साहित्य परिषदेने निवड समिती स्थापण केली होती. या समितीने गेल्या 3 महिन्यांपासून समाजातील गुणवंत व समाजासाठी कार्यरत असणारे नेते आणि कार्यकर्ते यांचा अभ्यास करुन कांही नावे निश्चित केली आहेत. थोरले सुभेदार मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक - लोकमाता अहिल्यामाई होळकर, महाराजा यशवंतराव होळकर यांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रचार व प्रसार, तसेच राष्ट्रीय, सामाजिक, धार्मिक ऐक्य, शांतता आणि सलोखा यासाठी घेतलेला पुढाकार, लोकशाहीचे बळकटीकरण, विविध आंदोलनाच्या माध्यमातून मांडलेले समाजाचे प्रश्नं, वेळोवेळी घेतलेली समाजहिताची भुमिका आणि समाजाच्या उज्वल भवितव्यासाठी व सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतीक, शैक्षणिक परिवर्तनासाठी दिलेले योगदानं, आपल्या समाजाची प्रतिमा उंचावण्यासाठी केलेले माणवतावादी कार्य असे विविध निकष लावून कांही मोजक्याच व्यक्तिमत्वांची यंदाच्या पुरस्कारांठी नावे निश्चित केली आहेत. त्यामध्ये पुढील गुणीजणांचा समावेश आहे.

1 ) “जीवनगौरव” पुरस्कार - मा. श्री. आण्णासाहेब डांगे – माजी मंत्री2) थोरले सुभेदार मल्हारराव होळकर “जेष्ठ समाजसेवक” पुरस्कार ( राजकीय विभाग ) – मा. आ. श्री. रामराव वडकुते

3) थोरले सुभेदार मल्हारराव होळकर “जेष्ठ समाजसेवक” पुरस्कार ( उद्योग विभाग ) मा. श्री. बाळासाहेब कर्णवर पाटील, व्हा. चेअरमन, सद्गुरु साखर कारखाना, राजेवाडी4) थोरले सुभेदार मल्हारराव होळकर “जेष्ठ समाजसेवक” पुरस्कार ( सामाजिक विभाग ) मा. अँड. श्री. गुंडेराव बनसोडे

5) महाराजा यशवंतराव होळकर “समाजरत्नं” पुरस्कार – मा. श्री. बजरंग खटके – फलटणं

6) शुरवीर विठोजीराव होळकर “क्रांतीरत्नं” पुरस्कार – मा. डॉ. श्री. इंद्रकुमार भिसे – अहमदनगर7) स्व. बी. के. कोकरे “समाजभुषण” पुरस्कार – मा. श्री. मारुती जानकर - सातारा

8) थोर समाजसुधारक हरी पिराजी धायगुडे “जेष्ठ समाजसेवक पुरस्कार” – मा. श्री. बापुसाहेब शिंदे – नाशिक

9) बॅरिस्टर टी. के. शेंडगे “जेष्ठ समाजसेवक” पुरस्कार – मा. प्राचार्य. शिवाजीराव दळणर – परभणी10) पुण्यश्लोक, लोकमाता – राजमाता अहिल्यादेवी होळकर “सामाजिक कृतज्ञता पुरस्कार” - मा. श्री. आकाराम कोळेकर, गजनृत्य कलाकार - आरेवाडी

11) आद्य महिला स्वातंत्र्यसेनानी भिमाबाई होळकर – “जेष्ठ समाजसेविका” पुरस्कार – मा. सौ. शुभांगी अशोकरावजी बन्नेनवर, नगराध्यक्षा – जत नगरपालिका या मान्यवरांचा समावेश आहे.


लातूर येथे दि. 9 ते 11 फेब्रुवारी 2018 या दरम्यानं आयोजित केलेल्या दुस-या आदिवासी धनगर साहित्य संमेलनात संमेलनाच्या अध्यक्षा मा. श्रीमती संगीता धायगुडे, जेष्ठ साहित्यिक मा. श्री. ना. धो. महानोर, मा. डॉ. श्री. कांचा इलय्या, मा. श्री. संजयजी सोनवणी यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या व समाजबांधवांच्या उपस्थितीत धनगर साहित्य परिषदेमार्फत या पुरस्कारांचे वितरणं केले जाणार आहे. या पुरस्काराचे स्वरुप शाल, श्रीफळ, महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जीवनकार्यावरील गौरव ग्रंथ, महाराजा यशवंतराव होळकर यांची प्रतिमा, स्मृतीचिन्हं, प्रमाणपत्र आणि मानाचा पिवळा फेटा असे असणार आहे.

त्यामुळे या –हद्य सोहळ्यास आपण सर्व समाजबांधवांनीही बहुसंख्येने हजर राहून या गुणीजनांवर अभिनंदनाचा वर्षाव करावा, आणि या ऐतिहासिक सोहळ्याचे आपणही साक्षीदार व्हावे, अशी आपणास नम्र विनंती. तर हे अत्यंत मानाचे आणि प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पुरस्कारप्राप्त समाजबांधवांच्यावर देशभरातील समाजबांधवांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत. – मा. इंजि. श्री – जयसिंगतात्या शेंडगे – अध्यक्ष, धनगर साहित्य परिषद, मा. डॉ. श्री. अभिमन्यू टकले – संस्थापक अध्यक्ष, आदिवासी धनगर साहित्य संमेलनं, मा. अँड. श्री. आण्णारावजी पाटील – स्वागत अध्यक्ष, दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलनं – लातूर, मा. श्री. संभाजीराव सूळ – उपाध्यक्ष - धनगर साहित्य परिषद, मा. श्री. तुकाराम पाटील – कोषाध्यक्ष, धनगर साहित्य परिषद, मा. श्री. अभिमन्यूदादा शेंडगे – जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, मा. श्री. पप्पू बुरुंगले – सामाजिक कार्यकर्ते, मा. अँड. श्री. भाऊसाहेब हाक्के पाटील – कार्याध्यक्ष, प्रा. डॉ. सिद्राम कटरे – राज्य समन्वयक, मा. प्रा. श्री. सुभाष भिंगे – संयोजक, मा. श्री. संजय चोरमले – कार्यालयीनं प्रमुख, दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलनं लातूर, मा. श्री. अशोकराव चिंचोळे – सामाजिक कार्यकर्ते, मा. श्री. बाळकृष्ण धायगुडे – सहाय्यक प्रसिद्दीप्रमुख, मा. अँड. श्री. मारुतीराव मांडुरके – मार्गदर्शक, मा. श्री. श्रीरंगजी शेवाळे – मार्गदर्शक, कार्यकारणी सदस्य - मा. श्री. प्राचार्य मधुकरराव सलगरे, मा. डॉ. श्री. सिद्राम सलगर, मा. अँड. श्री. मंचकराव ढोणे, मा. अँड. श्री. राजपाल भंडे, मा. श्री. भारत खंदारे, मा. श्री. राजेश खटके, मा. श्री. राहूल खांडेकर, मा. श्री. चंद्रकांत हजारे – सुप्रसिद्द व्याख्याते, तथा मराठवाडा समन्वयक मा. श्री. अमोल पांढरे, संचालक तथा प्रसिद्दीप्रमुख – धनगर साहित्य परिषद

No comments

Powered by Blogger.