मायणीत हाडांच्या ठिसुळपणाची अत्याधुनिक यंत्राद्वारे मोफत तपासणी


मायणी :-  येथील फ्रेंडस ग्रुप बहुउद्देशीय विकास संस्था,आरोग्य फाउंडेशन व मायणी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दि.४ रोजी हाडांच्या ठिसुळपणाची अत्याधुनिक यंत्राद्वारे मोफत तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर के.के.नेत्र रुग्णालय पुणे व श्री.विनायक हाँस्पिटल यांच्या सहकार्याने आयोजित केले असल्याची माहीती संस्थेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.

या मोफत आरोग्य तपासणी शिबीरामध्ये हाडांच्या ठिसुळपणाची अत्याधुनिक यंत्राद्वारे तपासणी बरोबरच पोट व मुत्रविकार,हनिॅया,मणक्याचे सर्व आजार,अपेंडिक्स, नेत्र तपासणी, मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी, बालरोग तपासणी, आदी तपासण्या करण्यात येणार आहेत .तसेच मोतीबिंदू असणार्‍या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया व इतर आजारांवर सवलत दरात शस्त्रक्रिया केली जाणार आहे.शिबिराच्या ठिकाणीअल्प दरामध्ये चष्मे वाटप होणार आहे .हेआरोग्य शिबीर चांदणी चौकातील चितळी रोडवरिल श्री विनायक हाॅस्पिटल येथे रविवारी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत पार पडणार असुन या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन फ्रेंडस ग्रुपचे अध्यक्ष महेश जाधव व श्री.विनायक हाँस्पिटलचे डाँ.उदय माळी यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.