समाजभूषण रामचंद्र बाबर यांच्यावर अॅन्जीओग्राफी


जावली : बहुजन रयत परिषदेचे माजी तालुका अध्यक्ष आणि अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार मिळालेले कुरवली बु ता फलटण येथील रामचंद्र शिवाजी बाबर यांच्यावर नुकतीच फलटण येथील लाइफलाइन हॉस्पीटल येथे डाॅ सागर गांधी डाॅ वीरश्री यांनी अॅन्जीओप्लास्टी ची शस्त्रक्रिया यशस्वी रित्या केली असुन त्यांची तब्येत चांगली असल्याची माहिती दिली गत चार दिवसापुर्वी मुंबई येथील मंत्रालयात कुरवली बु येथील दिलीप चव्हाण यांच्या कॅन्सर आजारावर उपचारासाठी शासकीय मदतनिधी आणण्यासाठी गेल्यानंतर छातीत दुखत असल्यामुळे ते फलटण येथे आल्यानंतर दवाखान्यात दाखल झाले गेली विस वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आसुन विविध शासकीय योजनांचा फायदा अनेकांना करून दिलेला आहे. सध्या त्यांची प्रकृती उत्तम असुन चार दिवसानंतर त्यांना दवाखान्यातुन घरी सोडण्यात येणार आहे. माजी आमदार तुकाराम तुपे यांचे सह संघटनेतील विविध पदाधिकारी यांनी दवाखान्यात भेट देिली

No comments

Powered by Blogger.