ज्ञान घ्यायला या ज्ञानी व्हा


कोयनानगर :-  ज्ञानी व्हा अशी शिकवण देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल या शाळेचे ऋण आज आपल्या यशस्वी वाटचालीत आहेत. विद्यालयाचे योगदान न विसरण्यासारखे आहेत .यामुळे या विद्यालया बाबत क्रूतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य आसल्याच्या भावनेने प्रेरित झालेल्या कोयनानगर येथील नेताजी सुभाषचंद्र हाइस्कूल च्या 1999 च्या बँच मधील माजी विद्यार्थी वर्गांने 18 वर्षानंतर सार्वजनिक जीवनामध्ये लोप पावत चाललेली क्रूतज्ञता कोयनानगर सारख्या ग्रामीण भागात गुणवत्तापूर्व शिक्षणामुळे जिवंत आसल्याचा माजी विद्यार्थी वर्गाने आविष्कार दाखवून दिला आहे.

कोयनानगर येथील नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल मध्ये 1999 साली शिकणा-या सर्वच माजी विद्यार्थी वर्गाने विद्यालयात ज्ञानार्जन करणाऱ्या भावी विद्यार्थी वर्गासाठी आधुनिक व गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळण्यासाठी विद्यालयाच्या ऋणात राहून त्याबदल क्रूतज्ञता व्यकत करण्यासाठी विद्यालयाला स्मार्ट टिव्ही भेट देवून शाळे बदल क्रूतज्ञता व्यकत केली.

विद्यालयाचे माजी प्राचार्य विलासराव घड्याळे ,प्राध्यापिका जयश्री घड्याळे, यांच्या हस्ते या विद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद पवार यांना स्मार्ट टिव्ही प्रदान करण्यात आला.यावेळी या विद्यालयाचे उपप्राचार्य एस एम पाटील ,अनिल यादव माजी विद्यार्थी संघटनेचे सुघोष खांडेकर , रामचंद्र यादव, देवेंद्र शेलार ,सुनील यादव, अरुणा शेलार ,शितल कदम ,अश्विनी मोरे, पॄथ्वीराज भोसले ,रोहित भस्मे ,स्मिता माने सुरेश नाटेकर आदी माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

सर्वांचे स्वागत माजी विद्यार्थी प्रतिनिधी अरुणा शेलार हिने तर आभार रामचंद्र यादव यांनी मानले

No comments

Powered by Blogger.