विक्रमबाबा भावाप्रमाणे, त्यांना पूर्ण ताकद देणार शंभूराज


पाटण:- स्वातंत्र्य सेनानी कै. भडकबाबा पाटणकर यांनी तालुक्यात सामाजिक क्रांती करून तालुक्यातील तमाम जनतेत एक वेगळा सामाजिक आदर्श निर्माण केला, त्यांचाच वारसा पुत्र विक्रमबाबा पाटणकर पुढे चालवत आहेत, वडिल कै भाई भडकबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त पाटण सारख्या ठिकाणी साहित्य संमेलनाचा उपक्रम कौतुकास्पद आहे, राजकीय,सामाजिक क्षेत्रात काम करताना चढउतार येत असतात,राजकारणा पलिकडे आमचे मैत्रीचे सबंध कायम होते, राजकारणात व्यक्तीगत सबंध जपले पाहिजेत,तालुक्यातील जनता बाबांच्या पाठीशी आहे मी सुद्धा विक्रमबाबांना भावाप्रमाणे पाठीशी उभे राहून मित्र म्हणून सवोॅतपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही आमदार शंभूराज देसाई यांनी दिली. 

पाटण येथे कै. भाई भडकबाबा पाटणकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ महोत्सव साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते, यावेळी (कै.उद्यसिंहबाबा पाटणकर) व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष प्रा.वैजनाथ महाजन सर, काँग्रेसचे हिंदुराव पाटील,स्वागताध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, साहित्यिक अरूण खांडके,ज्येष्ठ पत्रकार ए.व्ही.देशपांडे सर, राजेमहाडीक,संभाजीराव मोहिते सर यांची प्रमुख उपस्थिती होती, आमदार देसाई पुढे म्हणाले की एक वेळी विधानसभेच्या निवडणुकीत लोकनेते बाळासाहेब देसाईंना भडकबाबांनी निवडणुकीतुन आपली माघार घेऊन लोकनेत्यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी मदत केली होती त्याची देसाई परिवाराला जाण आहे, विक्रमबाबा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना त्यांचे काम मी अनुभवले आहे, बाबा तुम्ही घाबरू नका तुम्ही तर पाटणकर राजे आहात, साहित्य संमेलनासाठी शासनाच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी मी सवोॅतपरी सहकार्य करेन,सुंदरगडावरील दुर्ग संमेलनात छ शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनाचा अपमान केला हा प्रकार निंदनीय आहे. या साहित्य संमेलनामुळे पाटणच्या सांस्कृतिक सामाजिक क्षेत्राला चालना व स्फूर्ती मिळेल असे आमदार देसाई यांनी सांगितले, यावेळी संमेलनाध्यक्ष प्रा.वैजनाथ महाजन यांनी आपल्या भाषणात ग्रंथ महोत्सव साहित्य संमेलनाचे मानवी जीवनातील महत्त्व यावर संबोधन केले, हिंदुराव पाटील यांनी आपल्या भाषणात भडकबाबा पाटणकरांच्या जुन्या स्मृतींना उजाळा दिला, स्वागताध्यक्ष आयोजक विक्रमबाबा पाटणकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, अशोकराव देवकांत यांनी सूत्रसंचालन केले तर बकाजी निकम यांनी आभार मानले, या कार्यक्रमाला शालेय विद्यार्थी, शिक्षक, साहित्यप्रेमी, सर्व पक्षीय कार्यकर्ते, महिला नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते

No comments

Powered by Blogger.