देवापुर येथे नरवीर उमाजी नाईक यांचा स्मृतिदिन उत्साहात साजरा


म्हसवड ;- देवापुर ता. माण येथे आद्यक्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामस्थांच्या हस्ते करून स्मृतिदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
आद्यक्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त देवापुर गावचे माजी सरपंच शहाजी बाबर बोलताना म्हणाले कि हिंदुस्तानच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काही तशाच राहून गेल्या.सन १८५७ च्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो कि पळो करून सोडणारा व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरला गेला.तो म्हणजे 'उमाजी नाईक'.आज त्यांचा स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.उमाजी नाईक यांच्या समोर छत्रपती शिवरायांचा आदर्श होता त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे अन्यायापासून संरक्षण होण्यासाठी सतत इंग्रजांबरोबर लढत राहिले.नरवीर उमाजीराजेंचा आदर्श या तरुणांनी डोळ्यासमोर ठेवावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी अखिल महाराष्ट्र बेडर बेरड कृती समिती महाराष्ट्र राज्याचे सातारा जिल्हा युवक उपाध्यक्ष पै.विशाल जाधव ,राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य माण तालुकाध्यक्ष संदीप वंजारी आणि देवापुर शाखाध्यक्ष पै.निखिल चव्हाण, माजी सरपंच किसन चव्हाण,शिवाजी जाधव,नितीन चव्हाण,सुहास चव्हाण,लखन जाधव,राहुल जाधव,गणेश जाधव,पंकंज जाधव, सागर चव्हाण, शांताराम जाधव, सुशांत चव्हाण, कुणाल जाधव आदी उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.