‘पवार रिटायर होत आले तरी पाणीच देतायत’


दहिवडी : शरद पवार रिटायर होत आले तरी माणला पाणी देण्याची भाषा करत आहेत. पाणी पळवण्याच्या पाठीमागे जनता आजही जात आहे, यासारखे दुसरे दुर्दैव नाही. हल्लाबोल यात्रेची खिल्ली उडवत जनता आमच्याच पाठीमागे राहून आम्हालाच मते देईल. राज्य सरकारने शेतकर्‍यांसाठी अनेक चांगल्या योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करणार असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री ना. महादेव जानकर यांनी केले.

दहिवडी येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने शेतकरी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास राष्ट्रीय अध्यक्ष एस. एम. अक्कीसागर, प्रदेश महासचिव बाळासाहेब दोडतले, महिला प्रदेशाध्यक्ष श्रद्धा भातंबेकर, राज्य कार्यकारिणी सदस्य बबनदादा वीरकर, डॉ. उज्वला हाके, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होेते. जानकर म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाची लढाई उपेक्षित लोकांना अपेक्षित ठिकाणी नेण्याची असून पशुसंवर्धनचे बजेट 140 वरून 7 हजार 500 कोटींवर गेले आहे. दुधाचे दर 7 रुपये प्रति लिटर दर वाढवले असून दूध डेअरीवाल्यांनी दुधाला 25 रुपये दर लिटरला देणे बंधनकारक आहे. यासाठी 4 रुपये सबसिडी देण्यात येणार आहे. पक्षाला जातीचे लेबल लावू नका. आगामी काळात भाजप, रासप, शेतकरी संघटना व आरपीआय या सर्वांची युती कायम राहील व आमचीच सत्ता येईल, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष मामुशेठ वीरकर यांनी मनोगत व्यक्‍त केले.

No comments

Powered by Blogger.