दहावे ग्रामीण साहित्य संमेलन


मायणी : येथील मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या ,कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने गुरुवार दिनांक १५ रोजी दहावे ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी यांनी दिली.
दिनांक १५ रोजी सकाळी १० ते ११.३० या वेळेत संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. सदर संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक गोविंद पाटील (गारगोटी) यांची निवड करण्यात आली असून स्वागताध्यक्ष म्हणून मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन व जि.प. सदस्य सुरेंद्र गुदगे हे काम पाहणार आहेत. सदर वेळी सुधाकर कुबेर, [संस्थापक सचिव,मा.भा.शि. प्र. मंडळ ]बाळकृष्ण विभुते [उपाध्यक्ष ,मा.भा.शि.प्र मंडळ ] सुनिता गुरव [शिक्षणाधिकारी प्राथमिक जि .प .सातारा ] बलवंत पाटील [चेअरमन ,प्रा. शिक्षक बँक, सातारा ] लक्ष्मण पिसे [ प्र. गटशिक्षणाधिकारी,पं.स. खटाव ]व मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व संचालक उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११.३० ते १२ या वेळेत मायणीचे सुपुत्र कवी बाळासाहेब कांबळे यांच्या असे घडले महापुरुष या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार असून ग्रंथ समीक्षा प्रा. दिनेश वाघुंबरे [ बळवंत महाविद्यालय, विटा ]हे करणार आहेत .दुपारी १२ते १२.४५ या वेळेत साहित्याने समाजाला काय दिले ?या विषयावर चर्चासत्र होणार असून प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. प्रभाकर पवार [मुधोजी महाविद्यालय ,फलटण ] हे राहणार आहेत .दुपारी १.३०ते २.३०या वेळेत कथाकार रवी राजमाने [येळावी, जिल्हा सांगली ] यांचा कथाकथनाचा कार्यक्रम होणार आहे .दुपारी २.३०ते ४ या वेळेत कविसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला असून सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कवी प्रा. विजय शिंदे [आटपाडी ] हे भूषविणार असून, डॉ. हेमांगिनी माने या सूत्रसंचालन करणार आहेत. सदर कवी संमेलनात कवी किरण अहिवळे , (पळसगाव )श्रेया देशमुख ,अंकुश चव्हाण, शिवप्रसाद पवार ( चितळी ) विठ्ठल भागवत (विटा ) शाहीर नारायण कदम (धोंडेवाडी),कुंदा लोखंडे (मायणी ), महेश मोरे (निमसोड), आनंद बागल (कातरखटाव), कु. काजल शिंदे , सौ. रंजना सानप, कु. श्रीमयी दिवटे, कु. सानिका त्रिम्बके (मायणी ),भगवान वायदंडे (विटा ),कु.प्रियांका जाधव(कानकात्रे)आदी कवींचा या कविसंमेलनात सहभाग असणार आहे . सदर साहित्य संमेलन स्व. ज. गो. जाधव सांस्कृतिक भवन मायणी येथे आयोजित करण्यात आले आहे. संमेलनस्थळी ग्रंथप्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे आहे.

No comments

Powered by Blogger.