Your Own Digital Platform

सातारा जिल्हा पुनर्वसन कार्यालयात कोयना प्रकल्पग्रस्तांचे पर्यायी जमीनपाटण;-  कोयना प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसंदर्भात सातारा जिल्हाधिकारी यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत ठरल्या प्रमाणे सातारा जिल्हा पुनर्वसन कार्यालयात कोयना प्रकल्पग्रस्तांचे पर्यायी जमीन मागणीचे एकूण १८२९ अर्ज परिपूर्ण कागदपत्रांसह सातारा जिल्हा पुनर्वसन कार्यालयाचे तहसीलदार मा. निंबाळकर सो यांच्याकडे दाखल करण्यात आले, यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे राज्य कार्यकारणी सदस्य मा.श्री हरिश्चंद्र दळवी समवेत मालोजीराव पाटणकर, चैतन्य दळवी, संजय लाड, महेश शेलार, संतोष कदम, सचिन कदम, शैलेश सपकाळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.