मोदी यांचा हा शेवटचा अर्थसंकल्प: राज ठाकरे


सातारा : आज अर्थमंत्री अरूण जेटली यांनी नवा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पावर बोलताना, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शेवटचा अर्थसंकल्प आहे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. साताऱ्यात आयोजित ‘मनसे’च्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. समुद्रात उभारण्यात येणारा शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा म्हणजे मत मिळवण्यासाठी फडणवीस सरकारने तुम्हला दाखवलेले एक चित्र असल्याचेही ते म्हणाले.

मोदी देशाचे नव्हे तर गुजरातचे पंतप्रधान अशी खिल्लीही राज ठाकरे यांनी उडवली.तसेच देवेंद्र फडणवीस रोज नवीन आकडे काढतायत, मला कळत नाही ते रतन खात्री कडे कामाला होते का?असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

काय म्हणाले राज ठाकरे

> गुजरातचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचं शेवटचं बजेट जाहीर करत आहेत.

> आजची महाराष्ट्राच्या राजकीय परिस्तितीच विचार केला तर महाराजांच्या मनाला किती त्रास होत असेल त्याचा विचार करून पाहा.

>औरंगजेबाला शेवट पर्यंत शिवाजी नावाचा विचार मारता आला नाही.

> महाराजांचा महाराष्ट्र आज जाती पाती मध्ये अडकलाय.

> दळभद्री राजकारण्यांनी या देशाचा वाटोळं केले, नुसते पुतळे उभे करून काही होणार नाही.

>शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा समुद्रात उभा करायचा हे तुमच्या समोर दाखवलेलं फक्त एक चित्र आहे तुमची मत मिळवण्यासाठी.महाराजांचे खरे स्मारक हे त्यांचे गडकिल्ले आहेत.

>शिवाजी महाराजांच्या निधनानंतर 27 वर्ष औरंगजेब महाराष्ट्रात लढला,राहिला तो शिवाजी महाराजांना मारण्यासाठी आला नसून तो त्यांचे विचार मारण्यासाठी आला होता> केंद्र आणि राज्य सरकार हे नुसतं थापड्यांचे सरकार आहे.30 वर्षांनी मोदींना बहुमत मिळालं ते येण्यासाठी किती थापा मारणार.

>देवेंद्र फडणवीस रोज नवीन आकडे काढतायत मला कळत नाही रतन खात्री कडे कामाला होते का?

>महाराष्ट्रासारख सुसंस्कृत राज्य तुम्हाला जातीत आणि विभागात वाटायचंय.

>विकासाच्या नाववरती नुसत्या शेतकऱ्यांकडून जमिनी ओरबडल्या जातायत.

>धर्म पाटील तडफडतोय आणि मुख्यमंत्र्यांचे अंगावर बर्फ घेतानाचे फोटो येतात.

>आज करमणूक म्हणून तुम्ही राजठाकरेंच भाषण ऐकत असला तर याच भविष्यात तोटा होईल.

>राज ठाकरे तुम्हाला भडकवत नाही, आजच्या महाराष्ट्राची सत्य परिस्तिती सांगतोय.

>मोदींचे शेवटचे बजेट आज तेवढ्या वेळेत आपला हिशोब आटपून घेऊ

>संपूर्ण डोंगराने वेढलेले सातारा शहर,छत्रपतींच्या भूमीत आल्याने अभिमान

>दळभद्री राजकारण्यांनी देशाचे वाटोळे केले,निवडणूक जिंकण्यासाठी शाहू,फुले,आंबेडकर यांच्या नावाचा वापर,नुसते पुतळे उभे करून काही होणार नाही

>छत्रपती शिवाजी महाराज यांचा समुद्रात पुतळा उभा करणे सोपी गोष्ट नाही,हि अशक्य गोष्ट

>नितीन गडकरीचा खिसा फाटका-ठाकरे

>विकासाच्या नावावर शेतकऱ्यांकडून जमिनी ओरबाडून घेतल्या जातात

>हिम्मत असेल तर इतर राज्यात दुसऱ्या भाषेत बोलून दाखवा

>आवाज उठवला की राज ठाकरे संकुचित ठरतात

>मतांसाठी पुढील काही महिन्यांमध्ये देशात धार्मिक दंगली घडवल्या जातील

राज ठाकरे यांचा मनसे कार्यकर्त्यांना सल्ला

>मी तुम्हाला भडकवत नसून महाराष्ट्रातील सत्य परिस्थिती सांगतोय

>माझ्या स्पष्टपणे बोलण्याचा भविष्यात मला फायदा

>मी आपले दर्शन घेण्यासाठी साताऱ्यात आलो,मनातील गोष्टी सांगण्यासाठी आलो

>मतभेद झाले तरी चालतील व मनभेद होऊ देऊ नका

>मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पदाधिकारी म्हणून वावरण्यापेक्षा सहकारी म्हणून वावरण्याचा दिला सल्ला

No comments

Powered by Blogger.