सातारा : कोयनेत ३.२ रिश्टर स्केलचा भूकंप


पाटण : कोयना धरण परिसरात शुक्रवारी सकाळी ७. ११ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलमध्ये  ३. २  इतकी असल्याची माहिती भूकंप मापन केंद्र कोयनानगर यांनी दिली. 
भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून २१.६ किलोमीटर अंतरावर वारणा खोर्‍यात जावळे गावच्या दक्षिणेला दोन कि. मी. अंतरावर होता. तर, भूकंपाची खोली १४ कि. मी. अंतरावर होती. हा भूकंप पाटण,  कराड, चिपळूण, या तालुक्यांसह जावली विभाग व रत्नागिरी जिल्ह्यातील पोफळी, अलोरे, यासह वारणा खोर्‍यात अनेक ठिकाणी जाणवले.  या भूकंपाचा कोणताही परिणाम कोयना धरणावर झाला नसल्याचे धरण व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रथमदर्शनी पाटण तालुक्यात कोणतीही हाणी झाली नसल्याचे महसूल प्रशासनाने सांगितले आहे.

No comments

Powered by Blogger.