‘रागिनी MMS रिटर्न्स’च्‍या अभिनेत्रीचे 'पद्मावत फोटोशूट'


मुंबई :  ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’ची अभिनेत्री करिश्‍मा पद्मावतच्‍या प्रेमात पडली आहे. करिश्‍माने चक्‍क स्‍वत:ला पद्मावत अवतारात गढवून फोटोशूट केले आहे. हे फोटो तिने इन्‍स्‍टाग्रामवर शेअर केले मात्र, सोशल मीडिया युजर्सनी तिला ट्रोल केले आहे. विरोधानंतर 'पद्मावत'ची जादू कायम असून याची ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’ची अभिनेत्री करिश्‍मावरही चालली. पद्मावत चित्रपट रिलीज होताच करिश्‍माने पद्मावतीच्‍या अवतारात स्‍वत:ला गढवून घेतले. आणि तिने फोटोशूटदेखील केले. सोशल मीडियावर करिश्‍माने यातील काही फोटोज शेअर केले. त्‍याखाली करिश्‍माने कॅप्‍शन लिहिली आहे...'पद्मावत पाहिल्‍यानंतर मी दीपिकानं साकारलेल्‍या भूमिकेच्‍या प्रेमात पडले. हे शक्‍तीशाली महिलेचे पात्र अंगी भिनवण्‍याचा प्रयत्‍न आहे.' याच फोटोवरून करिश्‍मा ट्रोल झाली. भलेभले कॉमेंट्‍स तिच्‍या या फोटोजवर आल्‍या आहेत. दीपिकाची बरोबरी कोणीच करू शकत नाही, असं एका युजरने करिश्‍मावर टीका केली आहे. तर काहींनी तिचं कौतुकही केलं आहे. करिश्‍मा हॉट फोटो शेअर करत असल्‍यामुळे नेहमीच चर्चेत असते. आताही ती 'पद्मावत फोटोशूट'मुळे चर्चेत आली आहे.

No comments

Powered by Blogger.