विकासकामे गतीने मार्गी लावू : आ. शिवेंद्रराजे भोसले


कण्हेर :  कण्हेर भागात कोट्यावधीची विकासकामे केली असून उर्वरित विकासकामांना प्राधान्य देवून लवकरच तीही पूर्ण करु. निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे पदाधिकारी विकासाचे गाजर दाखवत आहेत. त्यांच्या भुलथापांना सूज्ञ लोकांनी बळी पडू नये. सारखळ मधील मुख्य रस्ता व स्मशानभूमी विकसित करुन शेती सिंचनाखाली येण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.

सारखळ, ता. सातारा येथील अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण, हरीजन वस्तीतील डांबरीकरण कामाचा शुभारंभ व व्यासपीठ लोकार्पण सोहळा अशा संयुक्‍त कार्यक्रमावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले बोलत होते.

यावेळी जेष्ठ कार्यकर्ते दादासाहेब बडदरे म्हणाले, गावात एकोपा राहिला तरच गावचा विकास झपाट्याने होईल. आ. शिवेंद्रराजे यांनी लोकांचा विश्‍वास सार्थकी लावण्यासाठी नेहमीच सहकार्य करुन गावांची विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य जनतेशी त्यांचा थेट संपर्क असून सामान्य लोकही त्यांच्या पाठीशी आहेत. यापुढील काळातही याच कार्यपद्धतीने विकासकामे करणार आहेत.

याप्रसंगी पं.स. सदस्या सौ. सरिता इंदलकर व युवा नेते इंद्रजित ढेंबरे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी जि.प. सदस्य प्रतिक कदम, माजी सभापती धर्मराज घोरपडे, नामदेवराव सावंत, सरपंच सुखदेव कडव, राहुल काळे, ग्रामसेवक राजन कांबळे, चंद्रकांत जाधव, शंकरराव काळे, सखाराम चांगण, विजय काळे, अनिल जाधव आदी उपस्थितीत होते.

No comments

Powered by Blogger.