क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात वार्षिक स्नेहसंमेलन


म्हसवड : क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मधील वार्षिक स्नेहसम्मेलन व पारितोषिक वितरण समारंभ क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात चांगल्या उत्साहात व आनंदमय वातावरणात पार पडला.

म्हसवड येथील क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मधील वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रम आयोजित केला होता. शैक्षणिक वर्षातील स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपअधीक्षक संभाजी सावंत,सौ.वर्षा सावंत,माणच्या शिक्षण विस्तार अधिकारी संगीता गायकवाड,क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.विश्वंभर बाबर,सचिव सुलोचना बाबर,संचालक इंद्रजित बाबर,शरयू बाबर,देवापुर गावचे सरपंच संजय जाधव तसेच प्राचार्य विठ्ठल लवटे, मुख्याध्यापक अनिल माने,राहुल फुटाणे, पूनम जाधव आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

दरम्यान पोलीस उपअधीक्षक संभाजी सावंत बोलताना म्हणाले वार्षिक स्नेहसंमेलन हा शैक्षणिक कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी आयोजित केला जातो.विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कलेचे गुण दर्शविणारा एक दुवा असतो.तसेच वर्षभरामध्ये विविध स्पर्धा परीक्षा मधून निवड झालेल्या विध्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी पारितोषिक कार्यक्रमाचे आयोजण करणे गरजेचे आहे.तसेच सावंत यांनी या स्नेहसंमेलन कार्यक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला.

माणच्या शिक्षण विस्तार अधिकारी संगीता गायकवाड बोलताना म्हणाल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे.विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी व त्यांच्या कला गुणांना चालना मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे आहे.हि कला क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात जोपासली जाते. तालुक्याच्या स्पर्धा परीक्षेची यादी ही क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांशिवाय पूर्ण होत नाही असे गौरोद्गार त्यांनी व्यक्त केले.स्पर्धा परीक्षेत या शैक्षणिक संकुलाचा ठसा तालुक्यात कायम रोवला जातो असे स्पष्ट केले.या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा करत संकुलातील मुला-मुलींनी उत्कृष्ट नृत्य सादर केले.नृत्यामध्ये कोळीनृत्य,विनोदी नाटिका, शेतकर्याच्या जीवनावरील नृत्य,कर्जबाजारी शेतकऱ्याची समस्या या वरील नाटक तसेच स्वच्छ भारत अभियान वरील नाटिका,लावणी,तसेच श्रीदेवी उर्फ चांदणी या अभिनेत्रीला नृत्यातून श्रद्धांजली वाहिली.अशा प्रकारे विविध गीतांचा नजराणा क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात संकुलातील क्रांतिवीर प्राथमिक,आत्मगिरी माध्यमिक विद्यालय,क्रांतिवीर इंग्लिश मेडियम,सिद्धनाथ बालक मंदिर मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
 
संकुलातील सर्व शिक्षक ,शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकुलातील मुख्याध्यपक अनिल माने व सहशिक्षक दादा राजगे यांनी केले व आभार तुकाराम घाडगे यांनी मानले.

No comments

Powered by Blogger.