कोयनेच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी बैठकीसाठी वेळ द्यावा- डाॅ भारत पाटणकर


पाटण : गेल्या सोळा दिवसापासून कोयनेच्या तीरावर आपल्या न्याय मागणीसाठी ठिय्या आंदोलन करणारे कोयना धरणग्रस्ताच्या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. दोन दिवसा पूर्वी मंत्रालयावर निघालेल्या शेतकरी मोर्चाला शासनाने दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे शांतीत क्रांती करणाऱ्या कोयना धरणग्रस्तानी शनिवार पर्यंत मंत्रालयात बैठक झाली नाही तर गुढीपाडव्याला आंदोलनाच्या ठिकाणी गुढी उभारून कोयना धरणग्रस्त मंत्रालयावर लॉंग मार्च काढणार आसल्याचा इशारा श्रमिक मूकती दलाचे अध्यक्ष तथा धरणग्रस्ताचे नेते डॉ.भारत पाटणकर यांनी दिला आहे.

शंभर टक्के विकसनशील पुनर्वसनासाठी गत सोळा दिवसापासून कोयनेच्या छत्रपती शिवाजी मैदानावर ठिय्या आंदोलन करणाऱ्या कोयना धरणग्रस्ताच्या आंदोलनाच्या सोळाव्या दिवशी शासनाने हे आंदोलन दुर्लक्षित केले आहे.यातच दोन दिवसापूर्वी मंत्रालयावर निघालेल्या शेतकरी मोर्चाला शासनाने दिलेल्या प्रतिसादामुळे गत सोळा दिवसापासून ठिय्या आंदोलनाचे रूपांतर सोमवार पासून लॉंग मार्च मध्ये करण्याचा निर्णय सर्व धरणग्रस्तानी घेवुन आंदोलनाची दिशा बदलली आहे.यावेळी डॉ भारत पाटणकर ,हरिश्चंद्र दळवी , शलाका पाटणकर,अॅड कृष्णा पाटील, बळीराम कदम ,दाजी पाटील ,महेश शेलार , श्रीपती माने यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना डॉ भारत पाटणकर म्हणाले की गेल्या 16 दिवसापासून सरकार कोयना धरणग्रस्ताचा अंत पाहत आहे.गुढीपाडव्याच्या आधी सरकारने कोयना धरणग्रस्ताच्या न्याय मागणीसाठी बैठक आयोजित करून या त्यागी व राज्याच्या उत्कर्षाला चालना देणाऱ्या धरणग्रस्ताचा सन्मान करावा.शनिवार पर्यत या धरणग्रस्ताना आश्वासन दिलेल्या सर्वच राजकीय नेत्यांनी बैठकीसाठी प्रयत्न करावा.

आजपर्यंत सत्तेत असलेल्या सर्वच शासनानी कोयना धरणग्रस्ताचे हे प्रश्न सोडविण्यात अपयश आले आहे.आजपर्यंत सत्तेत असलेल्या सर्वच शासनानी कोयना धरणग्रस्ताचे हे प्रश्न सोडविण्यात अपयश आले आहे त्यामुळे या सरकारला नावे ठेवण्याचा अधिकार काही मान्यवराना नसल्याचा टोला त्यांनी यावेळी लावला.

चौकट - खा.छ.श्री.उदयनराजे भोसले , पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी आ.शंभूराज देसाई ,माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी मुख्यमंत्री व धरणग्रस्ताची बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.येत्या शनिवार पर्यंत त्यांनी या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर बोलून बैठक आयोजित करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

No comments

Powered by Blogger.