सातारच्या साखरगाठ्या निघाल्या परदेशात


सातारा : मराठी नवीन वर्ष हे गुढीपाडव्यापासून सुरू होते. यानिमित्ताने महाराष्ट्रात या मराठी सणाला मोठे महत्व आहे. यंदा गुढीपाडवा १८ मार्च रोजी साजरा होत आहे. पाडव्याला पुजनासाठी लागणार्‍या साखरगाठी बनवण्याच्या कामाला सध्या सातारा शहरात वेग आला आहे. सातारा येथे तयार होत असलेल्या साखरगाठ्यांना परदेशी बाजारपेठेत चांगली मागणी असल्याने सातारची साखरगाठी सिडनी, न्यूयॉर्क, आबुधाबी, लंडन, दुबई, अमेरिका या ठिकाणी पोहोचली आहे.

मराठी नववर्ष गुढीपाडव्या दिवशी घरासमोर उंच गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते. गुढीसाठी लागणार्‍या साखरगाठी बनवण्याच्या कामाला सातार्‍यात ठिकठिकाणी वेग आला आहे. येथे तयार होणार्‍या साखरगाठीस सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, कोल्हापूर, अहमदनगर यासह अन्य जिल्ह्यातून मोठी मागणी असून इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका या देशात साखरगाठ्या पाठवण्यात आल्या आहेत.

No comments

Powered by Blogger.