Your Own Digital Platform

सह्याद्री पब्लिक स्कूल लोणंद चे स्नेह संमेलन दिमाखात संपन्न..लोणंद कृषि उत्पन्न बाजार समितीचे कार्यालयामध्ये सह्याद्री पब्लिक स्कूल चे स्नेह संमेलन अतिशय दिमाखात संपन्न झाले. या स्नेह संमेलनाचे उद्घाटन लोणंद नगरिच्या नगराध्यक्षा सौ. स्नेहलता शेळके पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके पाटील, पोलीस उपनिरीक्षक शुभांगी कुटे, उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके पाटील, नगरसेविका श्रीमती शैलजा खरात, प्राचार्या रिना रावळ आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या संमेलनात विद्यार्थ्यांनी विविध संगित गाण्यांवर अतिशय सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी विद्यार्थी व पालकांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी स्कूलचे शिक्षक व कर्मचारी परिश्रम घेत होते.