मुलींच्या अपेक्षा वाढल्याने वरपक्षाची पंचाईत


तरडगाव : लग्न म्हटलं की आपल्याला लग्न बेडीत अडकत असलेले नवरा नवरी पाहायला मिळतात. मात्र, हेच लग्न जुळवताना वरपक्षाच्यातील वडिलधारी मंडळी मात्र मेटाकुटीला आली आहेत. सध्या मुलींची घटती संख्या असल्याने उपवर वधू शोध घेणे अवघड होवून बसले असतानाच मुलींच्या भावी जोडीदाराविषयी वाढलेल्या अपेक्षांमुळे अनेक विवाह खोळंबून बसलेले आहेत. भावी जोडीदार सरकारी नोकरदार असल्याच प्राधान्य व शेती व अन्य ठिकाणी नोेकरी करणार्‍या मुलांना मुली लग्नास नकार देत असल्याने वरपक्ष सध्या चिंतेत असल्याचे दिसत आहे.

सध्या लग्नसराई जोमात आहे. अनेकांच्या लग्नाची सुपारी फुटली असून साखरपुडा झालेल्यांची लग्ने होत आहेत. तर काहीजणांची मुली पाहण्याचे कार्यक्रम ठरले आहेत. परंतु लग्न काही दिवसावर आलेले असतानाच अचानक एकाकडून नकारात्मक भूमिका आली की लग्न मोडीत निघण्याची शक्यता निर्माण आहे. सध्याच्या घडीला मुलींच्या लग्नाबाबत आलेल्या स्थलांकडूंन अपेक्षा वाढत चाललेल्या मुलांची लग्ने ठरण्याचे वांदे होत आहेत. लग्न जमवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते आहे. सरकारी नोकरी, पर्मनंट जॉब, याबरोबर बागायती जमीन असली तरी मुलगा शहरात नोकरी करणारा असावा, याला मुली व वधूपक्षाकडून प्राधान्य दिले जात आहे.

परंतु सद्य स्थितीत वाढलेली लोकसंख्या आणि सरकारी नोकरीतील झालेली घट लक्षात घेता तरी किती मुलींच्या वाट्याला सरकारी नोकरदार येईल हाही प्रश्‍नच आहे. त्यामुळे इतर ठिकाणी कार्यरत असलेली अनेक मुले ही चांगल्या स्थितीत असूनही अनेक वर्ष लग्न ठरण्यापासून वंचितच राहताना दिसत असतात. शेतकरी नवरा नको गं बाई असा पवित्रा उपवर मुलींनी घेतला आहे. त्याचप्रमाणे चालक, गवंडी, बिगारी आदी तत्सम व्यवसाय करणार्‍या मुलींची गत झाली आहे.

वास्तविक मुला-मुलांची पसंती वरुनच खरे तर सर्व लग्नाची सूत्रे जुळत असतात. परंतु, मुलापेक्षा मुलीच्याच निर्णयाला जास्त महत्त्व असते. घरच्या लोकांनी लग्नाबाबत आज घेतलेले निर्णय उद्या ते निर्णय असतीलच याची ही काही शाश्‍वती देता येत नाही. सुफारी फुटण्यापासून लग्नाचा बस्ता भरण्यापासून ते लग्नाच्या स्टेजपर्यंत जाण्याची तयारी सुरु असतानाही लग्न मोडली जात असतात.

शेवटी प्रत्येक कुटुंब चांगले स्थळ कसे मिळेल हीच अपेक्षा मनात ठेवून पुढची दिशा ठरवत असते. मात्र, योग्य स्थळ मिळत नसल्याने काही ठिकाणी मुला- मुलींचे लग्नाचे वय निघून तर जात नाही ना या भीतीपोटी हताश झालेली कुटुंबे घाई घाईत लग्न ठरवून मोकळी होत आहेत. त्यानंतर आपली फसगत झाली असे म्हणत नशिबाला दोष देत आहेत. लग्न हे दोन मनांचे मिलन आहेच, शिवाय ते दोन कुटुंब व दोन्ही कडचे नातेवाईक-सगेसोयरे यांचाही स्नेहबंध जोडणारे आहे. त्यामुळे लग्न जोडताना आर्थिक परिस्थितीबरोबरच मुला-मुलींचे स्वभाव, निर्व्यसनी मुले,
कर्तबगारी, आवडी-निवडी या गोष्टींचाही विचार करण्याची गरज आहे.

No comments

Powered by Blogger.