विनयभंग प्रकरणी महाबळेश्वरच्या डॉक्टरवर गुन्हा


महाबळेश्वर :  सातारा येथील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी महाबळेश्वर येथील डॉ. भांगडिया यांच्यावर ३५४ (अ) नुसार विनयभंगाचा गुन्हा महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

महाबळेश्वर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीमध्ये सदर महिला व सोबत एक महिला अशा दोघी मंगळवारी दुपारी १२.३० वा.च्या सुमारास महाबळेश्वर येथे राजश्री महिला विकास सामाजिक संस्थेची वर्गणी गोळा करण्यासाठी आल्या होत्या. फिर्यादी महिलेच्या अचानक पोटात दुखू लागल्याने फिर्यादी महिला ही ताणू पटेल स्ट्रीट येथील रोडच्या डाव्या बाजूस असलेल्या डॉ. भांगडिया यांच्या दवाखान्यात सोबतच्या महिलेबरोबर गेली.

यावेळी दवाखान्यात पेशंट कोणीही नव्हते, फिर्यादी महिला डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेली. सोबत आलेली महिला बाहेर थांबली होती. डॉक्टरांनी कंपाऊंडरला तिकीट आणायला सांगून बाहेर पाठविले व फिर्यादी महिलेस आतमधील स्वतंत्र केबिनमध्ये तपासणी करीता बोलावले. त्यावेळी फिर्यादी महिलेच्या पोटासह गुप्तांगावर हात फिरविला. त्यानंतर डॉक्टरांनी औषधे लिहून दिली व पैसे देत असताना त्यांनी पैसे घेतले नाहीत. बाहेर आल्यानंतर घडलेला प्रकार बाहेर आल्यावर सोबत असलेल्या महिलेस सांगितला. याबाबत महाबळेश्वर पोलिस ठाण्यात डॉ. भांगडिया यांच्या विरोधात पोलिसांनी ३५४ (अ) नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.सुनिता डोईफोडे तपास करीत आहेत.

No comments

Powered by Blogger.