पोंभुर्ले येथे बाळशास्त्री जांभेकर यांच्या 172 व्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन


पोंभुर्ले : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 172 व्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन कार्यक्रम पोंभुर्ले, ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग येथील जांभेकर स्मारक प्रकल्पातील दर्पण सभागृहात गुरुवार, दि.17 मे 2018 रोजी स.10 वा. आयोजित केला आहे.

यावेळी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, देवगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र मुंबरकर व त्यांचे सहकारी पदाधिकारी, शिवसेनेचे देवगड तालुका प्रमुख अ‍ॅड.प्रसाद करंदीकर, पोंभुर्ले ग्रामपंचायतीचे सरपंच सादिक डोंगरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमास जांभेकर प्रतिष्ठानचे विश्‍वस्त मधुकर जांभेकर, सुधाकर जांभेकर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

या अभिवादन कार्यक्रमास पोंभुर्ले पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पत्रकार, यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पोंभुर्ले ग्रामपंचायत पदाधिकारी व जांभे - देऊळवाडी ग्रामस्थ, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके, जांभेकर कुटुंबिय यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.