माधुरीच्‍या 'धकधक'वर अख्‍खं जग फिदा


मुंबई : ती सुंदर, तिच्‍या हसण्‍यावर सारं जगं फिदा, ती 'मोहिनी', आणि टॅलेंटेड असणारी 'धकधक गर्ल' माधुरीचा आज ५१ वा वाढदिवस. तिच्‍या आयुष्‍याबद्‍दल आणि बॉलिवूड करिअरबद्‍दल थोडक्‍यात जाणून घेऊयात.

करिअरची सुरूवातमुंबईमध्‍ये जन्‍मलेल्‍या माधुरीने आपल्‍या चित्रपट करिअरची सुरूवात १९८४ मध्‍ये चित्रपट 'अबोध'मधून केली होती. यानंतर तिने अनेक अभिनेत्‍यांसोबत चित्रपट केले.


अभिनेत्री व्‍हायच नव्‍हतं...

माधुरीच अभिनय क्षेत्रात येण्‍याच स्‍वप्‍न नव्‍हतं. तिला पॅथोलॉजिस्ट व्‍हायच होतं.


संजय दत्त आणि माधुरी 

माधुरीच संजय दत्तच नाही तर इतर अभिनेत्‍यांशीही नाव जोडण्‍यात आलं आहे. संजय दत्त आणि माधुरी दीक्षितच्‍या अफेअरबद्‍दल सर्वश्रृत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांचं अफेअर चित्रपट 'खलनायक' च्‍या शूटिंगवेळी सुरू झालं होतं. परंतु, हे नातं फार काळ टिकलं नाही. परंतु, आजही त्‍यांच्‍या अफेअरबद्‍दल बोलले जाते.

अनिल कपूर-माधुरी दीक्षितचे हिट चित्रपट

माधुरी आणि अनिल कपूर यांनी एकत्र अनेक हिट चित्रपटांत काम केले आहे. दोघांची ऑनस्‍क्रिन जोडी प्रेक्षकांना आवडली होती. दोघांनी एकत्र अनेक चित्रपट केल्‍याचे त्‍यावेळी त्‍यांच्‍या अफेअरचे वृत्त पसरले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांचे अफेअर सुरू होते. परंतु, त्‍याबद्‍दल दोघांनीही उघडपणे सांगितले नाही.


सलमान खानपेक्षा अधिक मानधन 

सलमान खानपेक्षा ज्‍यादा मानधन घेणारी अभिनेत्री माधुरी दीक्षितच होती. माधुरी दीक्षितने 'हम आपके हैं कौन' साठी सलमान खानपेक्षाही अधिक मानधन घेतलं होतं. यावरून समजतं की, माधुरीला चित्रपटांसाठी किती डिमांड होती.

No comments

Powered by Blogger.