साताऱ्यात शरद पवारांनी उडवली कॉलर


सातारा : सातारचे खासदार उदयनराजे भोसले नेहमी कॉलर उडवतात. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनीही कॉलर उडवून दाखवली होती. शशिकांत शिंदेही मधेच कॉलरला हात लावतात पण या सर्वांना आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी तडाखेबंद उत्तर देत स्वतःच कॉलर उडवून दाखवली रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर पुण्यतिथी सोहळ्यानंतर शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली.

 त्यात सातारा लोकसभा निवडणुकीच्या संदर्भाने प्रश्न विचारला गेला. उदयनराजे व इतर आमदार यांच्यात पेच निर्माण झाला आहे तो कसा सोडवणार असे विचारण्यात आले. त्यावर शरद पवार म्हणाले, पेच बीच काही निर्माण होत नाही. मी आलो की सगळे एका दोरीत सरळ होतात.

त्यावर तुम्ही उतारा काय काढला आहे का असे पुन्हा विचारताच ते म्हणाले, नाही उतारा काढायची गरज नाही. २०१९ पर्यंत सगळे सरळ होतील. सगळ्यांची कॉलर खाली येईल. हे सांगताना पवार यांनी स्वतःच्या कॉलरला मात्र हात लावला. पवार यांच्या विधानाचे सोयीस्कर अर्थ काढले जात आहेत..

No comments

Powered by Blogger.